पुणे-सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिराच्या ब्रह्मोत्सवास सोमवारी सायंकाळी पारंपरिक पद्धतीने उत्साहाच्या वातावरणात प्रारंभ झाला .महालक्ष्मी मंदिराच्या ३४ व्य वर्धापनदिनानिमित्त श्री महालक्ष्मी मंदिर , सारसबाग तर्फे दिनांक २२ जानेवारी ते २४ जानेवारी पर्यंत ३ दिवस ब्रह्मोत्सवा निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. काल सोमवारी सायंकाळी ७ वाजता राजस्थान मधील डिडवाना येथील झालरीया पिठाचे महंत घनश्यामाचार्यजी महाराज व स्वामीजी श्री भुदेवाचार्यजी महाराज यांच्या उपस्थित मंदिराचे प्रमुख विशवस्त श्री राजकुमारजी अगरवाल व त्यांच्या पत्नी सौ . अमिता अगरवाल यांच्या हस्ते कळस स्थापना आणि गरुड ध्वजाची स्थापना करण्यात आली . त्यानंतर श्री महालक्ष्मी देवी , सरस्वतीदेवी आणि कालीमातेची पवित्र मंत्रोपचाराने धार्मिक पूजा उत्साहाच्या वातावरणात करण्यात आली . यानंतर भाविकांनी अभिषेक केले . याप्रसंगी मंदिराचे विश्वस्त ऍड प्रताप परदेशी , हेमंत अर्नाळकर , सौ तृप्ती अगरवाल , श्री रमेश पाटोडीया आदी उपस्थित होते.