पुणे- भारत रत्न माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९४ व्या जयंतीदिनी रक्तदान महायज्ञ आयोजित करून ५ हजार रक्दाते मिळवून ५ हजार बाटल्या रक्त गोळा करण्याचा संकल्प नगरसेवक हेमंत रासने मित्र परिवारातर्फे करण्यात आला आहे. हे शिबीर २३ डिसेंबर रोही सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बाजीराव रस्त्यावरील नूमवि प्रशालेमध्ये होणार आहे .आणू या शिबिराच्या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निमंत्रित करण्यात आले आहे अशी माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट चे उत्सवप्रमुख नगरसेवक हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेतून दिली .
पालकमंत्री गिरीश बापट ,राज्यमंत्री दिलीप कांबळे,महापौर मुक्ता टिळक ,भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले,खासदार अनिल शिरोळे,आमदार विजय काळे,माधुरी मिसाळ,मेधा कुलकर्णी,सभागृहनेते श्रीनाथ भिमाले आदी मान्यवर पदाधिकारी नगरसेवक यावेळी उपस्थित राहणार आहेत . ससून ब्लड बँक ,पी एस आय ब्लड बँक ,जनकल्याण रक्तपेढी -पुणे- नगर- जालना ,घोलप ब्लड बँक,भारती ब्लड बँक अशा विविध रक्तपेढ्या यात सहभागी होणार आहेत.गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते,महाविद्यालयीन तरुण आणि असंख्य नागरिक यावेळी रक्तदान करणार आहेत .

