‘रुमानी शायरी’त पुणेकर दंग!
‘रसिक मित्रमंडळ’च्या ‘एक कवी,एक भाषा’व्याख्यानमालेत
डॉ.सय्यद तकी अबिदी यांच्या व्याख्यानाला चांगला प्रतिसाद
पुणे :
‘रुमानी उर्दू शायरी’ म्हणजे ‘रोमँटिक उर्दू शायरी’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय अभ्यासक डॉ. सय्यद तकी अबिदी (कॅनडा) यांच्या व्याख्यानमाला पुणेकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला!
निमित्त होते ‘रसिक मित्र मंडळ’ आयोजित ‘एक कवी, एक भाषा’ या मासिक व्याख्यानमालेतील डॉ. सय्यद तकी अबिदी (कॅनडा) यांचे व्याख्यान! हे व्याख्यान पुणे श्रमिक पत्रकार संघात मंगळवारी सायंकाळी आयोजित करण्यात आले होते. व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला, मुनव्वर पीरभॉय, मुमताझ पीरभॉय होत्या.
तर श्रोत्यात भारत सासणे, आनंद देशमुख, डॉ. मुश्ताक मुकादम, प्रदीप निफाडकर हे दिग्गज होते.
डॉ. सय्यद तकी अबिदी म्हणाले, ‘उर्दूची बारात पुण्यात पोहोचली आहे. उर्दू ही एका धर्माची भाषा नाही. तर सर्व देशाची भाषा आहे. उर्दू भाषेचे वय कमी आहे, पण कमी वयात प्रेमाचा अधिक संदेश या भाषेने दिला.’
प्रेम, रोमान्स हा एक हिरा आहे आणि त्याचे सर्व पैलू, कवडसे, किरणे आणि चमक उर्दूने आपल्या शब्दात पकडले आहेत. शृंगार रस आणि मानवी नात्याने उर्दूचे शब्द ओतप्रोत भरले आहे. या भाषेचे शब्द भांडार मोठे आहे ते अभ्यासले पाहिजे. या व्याख्यानात उर्दूतील सर्व कवींच्या शायरीचा त्यांनी परिचय करून दिला.
मुनव्वर पीरभॉय यांनी परिचय करून दिला. मुमताझ पीरभॉय यांनी सूत्रसंचालन केले. ‘रसिक मित्र मंडळा’चे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला यांनी प्रास्ताविक केले.