रसिक मित्र मंडळ आयोजित ‘एक कवी ,एक भाषा ‘ व्याख्यानमालेला चांगला प्रतिसाद
पुणे :
‘भेटेन नऊ महिन्यांनी ‘ ही अजरामर कविता लिहिणारे ‘कुंजविहारी ‘ हे मराठीतील राष्ट्रप्रेमाचे श्रेष्ठ कवी होते ‘असे उद्गार कुंजविहारी यांचे अभ्यासक डॉ . सुभाष शेकडे यांनी काढले .
रसिक मित्र मंडळ आयोजित ‘एक कवी ,एक भाषा ‘ व्याख्यानमालेत ते बोलत होते . पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या या व्याख्यानमालेचे हे ४६ वे पुष्प होते .
रसिक मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते . कवी प्रदीप निफाडकर यांनी प्रास्ताविक केले . मधू पोतदार यांनी परिचय करून दिला .
डॉ . सुभाष शेकडे म्हणाले ,’पारतंत्र्याविरुद्ध आवाज उठविल्याबद्दल कवी कुंजविहारी यांची नोकरी गेली होती .तरी त्यांनी राष्ट्रप्रेमाने भारलेल्या अजरामर कविता लिहिल्या . स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या तरुणांना ‘भेटेन नऊ महिन्यांनी ‘ ही कविता मंत्रवत ठरली . स्वातंत्र्यासाठीच्या काँग्रेसच्या लढ्यात देखील या कवितेने प्रेरणा दिली ,अधिवेशनातून निधी संकलन करून दिले . स्वतः कुंजविहारी यांनी मात्र स्वातंत्र्यानंतर पेन्शन नाकारली . ‘भेटेन नऊ महिन्यांनी ‘ ही कविता स्वातंत्र्यसैनिकांच्या ध्येयवादाचे चिरंतन प्रतीक ठरले आहे ‘
‘माझे ध्येय ‘ सारख्या त्यांच्या इतर कविता गाजल्या असल्या तरी ‘भेटेन नऊ महिन्यांनी ‘या एकाच कवितेने ते अजरामर ठरले
या व्याख्यानाला पुणेकर रसिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते