राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. गणेश देवी यांची सर्वानुमते निवड

Date:

पुणे (प्रतिनिधी) :
राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. गणेश देवी यांची सर्वानुमते आज निवड करण्यात आली. राष्ट्र सेवा दलाच्या राज्यमंडळ आणि सेवादल मंडळाची राष्ट्रीय बैठक झाली त्यात ही घोषणा करण्यात आली. पूर्व अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार यांनी डॉ. देवी यांच्याकडे अध्यक्ष पदाची सूत्रे आज सोपवली.

यावेळी राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना डॉ. गणेश देवी म्हणाले, ‘राष्ट्र सेवा दलाच्या प्रत्येक कार्यकर्त्याजवळ लोकशाही समाजवाद आणि साने गुरुजींच्या विचारांची शिदोरी आहे. सेवा दल कार्यकर्त्यांजवळ प्रगल्भता, कृतीशिलता आणि सभानता ही त्रिगुणसूत्री आहे. या वारशाच्या जोरावर देशातील लोकशाही समाजवाद मानणाऱ्या नागरिकांकडे जाऊन आपण त्यांना सेवा दलाशी जोडूया. समविचारी व्यक्ती, संस्था आणि प्रक्रिया यांची भक्कम एकजूट उभारून आपण फॅसिस्ट शक्तींशी लढूया.

पुण्यात साने गुरुजी स्मारकावर सेवा दल मंडळाची बैठक झाली. त्यावेळी राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश परांजपे, विश्वस्त आमदार कपिल पाटील, अंजलीताई आंबेडकर, डॉ. झहीर काझी, सुरेखाताई दळवी, माजी अध्यक्ष पन्नालाल सुराणा, अरविंद कपोले, भरत लाटकर हे उपस्थितीत होते. निवडणूक निर्णय अधीकारी म्हणून झाकीर अत्तार यांनी काम पाहिले.

डॉ. गणेश देवी यांच्याविषयी…
पद्मश्री डॉ. गणेश देवी हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषाशास्त्रज्ञ, विचारवंत आणि सांस्कृतिक नेते म्हणून प्रसिध्द आहेत. तर दक्षिणायन चळवळीमुळे १३ राज्यं त्यांना आपला माणूस मानतात. भारतातील ७५० भाषांमधील लोक त्यांना आपल्या बोली भाषांना सन्मान आणि अस्मिता देणारा प्रेरक मित्र मानतात. मराठीतील माध्यमं त्यांना ऋषीतुल्य म्हणून गौरवतात. राष्ट्रीय किंवा राजभाषा म्हणून मान्यता नसलेल्या ४० भाषांना त्यांनी नवी ओळख मिळवून दिली. समूहांची ओळख करुन देणारा भाषा शास्त्रज्ञ गणेश देवी. देशातील लुप्त होणाऱ्या शेकडो वंचित व भटक्या समाजाच्या भाषांना त्यांनी आपल्या कामाने संजीवनी दिली. देशातील ७५० भाषांची नोंद करण्याचं संशोधनाचं ऐतिहासिक काम देवी यांनी त्यांच्या ३००० सहकारी अभ्यासकांच्या साथीने ३ वर्षात पूर्ण केलं.

आदिवासी आणि अनेक वंचित समूहांशी नातं जोडणारा आपला माणूस म्हणजे गणेश देवी. साने गुरुजी आणि सेवा दलावर निस्सिम प्रेम करणारा धडपडणारा विचारवंत कार्यकर्ता म्हणजे गणेश देवी. गांधी आंबेडकर विचारांच्या समन्वयासाठी धडपडणारा दुवा म्हणजे गणेश देवी.

इंग्रजी भाषेचे प्रध्यापक म्हणून बडोदयाच्या महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठात त्यांनी अध्यापन केले. त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. सुरेखा देवी या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शास्त्रज्ञ आहेत. नोबेल प्रईज निवड समितीच्या केमिस्ट्री विभागात तज्ज्ञ सदस्य म्हणून सुरेखा देवींनी काम केलं आहे. इंग्लंडमधील विद्यापीठांमध्ये त्यांनी अध्यापन केले आहे.

पुणे जिल्हयातील भोर हे डॉ. गणेश देवी यांचं जन्मगाव. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात त्याचं उच्च शिक्षण झालं. इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ लिड्समध्येही काही काळ त्यांनी शिक्षण घेतलं. मराठी, गुजराती आणि इंग्रजी भाषेत त्यांनी लेखन केलं. वानप्रस्थ (मराठी) आदिवासी जाने छे (गुजराती) अफ्टर अ‍ॅम्नेशिया (इंग्रजी) ही डॉ. गणेश देवी यांची पुस्तकं गाजली. १०० च्या वर त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. गुजरातमधील आदिवासी क्षेत्रात आदिवासी संस्कृतीचा अभ्यास आणि संवर्धन करणारं मोलाचं काम डॉ. देवी यांनी केलं. त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला. साहित्य अकादमीचा देशपातळीवरील मानाचा पुरस्कारही त्यांना मिळाला. देशात नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या विचारवंतांच्या हत्येनंतर अस्वस्थ होऊन डॉ. देवी यांनी दक्षिणायन ही चळवळ सुरु केली. त्यात देशभरातील हजारो लेखक, कलाकार, शास्त्रज्ञ, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते सामिल झाले. विचारवंतांच्या हत्येचा निषेध म्हणून पुरस्कार वापसीच्या चळवळीला चालनाही गणेश देवी यांनीच दिली. दक्षिणायन आता देशातली महत्वाची वैचारिक चळवळ बनली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबई महापालिकेचे बजेट 80,952 कोटींचे,पण तब्बल 36 हजार कोटींच्या ठेवी वापरणार….

मुंबईकरांसाठी या अर्थसंकल्पात एक महत्त्वाची बाब समोर आली आहे....

बदलत्या काळानुसार पत्रकारांनी तंत्रस्नेही होणे गरजेचे – प्रा. सुशोभन पाटणकर

ए आय तंत्रज्ञानाद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी शहानिशा आवश्यक पिंपरी,...

मुंबई प्रमाणे पुण्यातही 500 चौ. फूट घराला मिळकत कर शून्य करा- स्थायी च्या पहिल्या बैठकीत कॉँग्रेस चा प्रस्ताव

ऐतिहासिक निर्णयाबाबतचा चेंडू आता अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंच्या मैदानात.. प्रशासनाचा...

सोलर एनर्जी प्रकल्प वापरणाऱ्यांना मिळकत करात 10 टक्के सवलत द्या – दुधाने आणि मानकर यांचा प्रस्ताव

पुणे-सोलर एनर्जी प्रकल्प, म्हणजेच सूर्यप्रकाशाद्वारे वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प...