महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप
मुंबई -पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त आय पीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची आज मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्यात दोन तास चौकशी करण्यात आला असून पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविला आहे. 23 मार्चलाही त्यांचा पुन्हा जबाब नोंदविला जाणार आहे.राज्यात सत्ता स्थापनेच्या काळात महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप आरोप त्यांच्यावर आहे.
रश्मी शुक्ला या राज्य गुप्त वार्ता विभागाच्या प्रमुख असताना त्यांनी दहशतवादी कारवायांच्या तपासासाठी फोन टॅपिंगची परवानगी मागितली होती. या परवानगीचा त्यांनी गैरवापर करीत महाविकास आघाडीच्या नेत्यांचेच फोन टॅप केला असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. राज्यात सत्ता स्थापनेवेळी भाजप – महाविकास आघाडीत द्वंद्व सुरू होते. सत्ता स्थापनेत संजय राऊत यांची महत्वाची भूमिका होती. राऊत व एकनाथ खडसे यांचे शुक्ला यांनी फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.फोन टॅपिंग प्रकरण उघडकीस आल्यानंतर पंधरा दिवसांपुर्वी त्यांच्यावर कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. त्यांच्यावर कठोर कारवाई तुर्तास करू नये असे संरक्षण त्यांना उच्च न्यायालयाकडून देण्यात आले.

