ईडी अधिकाऱ्यांकडून खंडणी रॅकेट:चौकशीसाठी मुंबई पोलिसांकडून एसआयटी स्थापना- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

Date:

मुंबई-ईडीचे काही अधिकारी खंडणी रॅकेट चालवत असल्याचा आरोप काही दिवसांपुर्वी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी केला होता. या आरोपांचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांचा समावेश असलेल्या विशेष पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त वीरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी काम करेल व त्यांना तपासासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा देण्यात येईल, अशी माहिती आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

काही दिवसांपुर्वी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी ईडीचे अधिकारी व भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. ईडीचे वरिष्ठ अधिकारी जितेंद्र नवलानी हे मुंबईत खंडणीचे रॅकेट चालवतात. त्यांनी 100 हून अधिक बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी घेतली आहे. याचे पुरावेदेखील आपल्याकडे असून ते महाराष्ट्र पोलिस व केंद्र सरकारला देणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले होते. तसेच, ईडीच्या या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा भाजप नेत्यांशीही संबंध आहे. किरीट सोमय्या यांचा नवलानीशी काय संबंध आहे हे त्यांनीच सांगावे, असे राऊत म्हणाले होते. यासंदर्भात राऊत यांनी दिलेल्या पुराव्यांची दखल घेत मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाकडून आता या प्रकरणाची चौकशी केली जात असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

राज ठाकरेंवर कारवाई होणार?
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतेच गुढीपाडव्यावरून मशिद, मदरसे व भोंग्याबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली. या वक्त्यांवर कारवाई करणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील म्हणाले, राज ठाकरे यांच्या वक्तव्याची चौकशी केली जाईल. तपास करूनच त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईळ. तसेच समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य आता कोणीही करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

नाशिक पोलिस आयुक्तांना समज देणार!
नाशिकचे पोलिस आयुक्त पांडे यांनी नुकतेच महुसल अधिकारी हे प्रचंड वसुली करतात. ते आरडीएक्सप्रमाणे असल्याचे वक्तव्य केले होते. नंतर त्यांनी आपले वक्तव्य मागेही घेतले होते. मात्र, महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीने असे बेजबाबदार वक्तव्य करू नये. काही तक्रार असल्यास राज्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात दाद मागावी. नाशिक पोलिस आयुक्तांनी केलेल्या या वक्तव्याबद्दल त्यांना समज देणार असल्याचेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...