मंत्रालयात रंगली मराठी अभिवाचन स्पर्धा

Date:

मुंबई, दि. १४ : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात मराठी अभिवाचनाचा कार्यक्रम चांगलाच रंगला. मराठी साहित्यातील ऐतिहासिक, विविध रसांनी परिपूर्ण अशा विविध भावभावना असलेल्या साहित्यातील उताऱ्यांचे अभिवाचन मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले. मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त या अभिवाचन  स्पर्धेचे आयोजन मराठी भाषा विभागातर्फे करण्यात आले.

यावेळी  मराठी भाषा  विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे, माहिती व  जनसंपर्क सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, सहसचिव मिलींद गवादे, परिक्षक श्रीनिवास नार्वेकर, अस्मीता पांडे यावेळी  उपस्थित होते.

स्पर्धकांनी यावेळी वेगवेगळया विषयावर अभिवाचन करून मराठी भाषेचे वैविध्य अभिवाचनातून मांडले. शिवाजी सावंत यांचे युगंधर, लेखिका संपदा जोगळेकर यांचे ध्यानस्थ, मंगेश पाडगावकरांचे ‘असे होते गांधीजी’ संतोष गेडाम यांचे ‘खेड्यातलं मरण’ डॉ.अपर्णा बेडेकर यांचे वैचारिक लेख, सोनचाफ्याचे झाड-एक आकलन, धनश्री लेले यांच्या सोनचाफ्याची फुले अशा विविध पुस्तकातील अभिवाचनाने स्पर्धकांनी मराठी भाषा, साहित्यावर प्रकाश टाकला.

यावेळी परिक्षक म्हणून श्रीनिवास नार्वेकर यांना काम पाहिले. श्री. नार्वेकर यांनी नाट्य,  एकांकिका, लेखन, दिग्दर्शन, अभिनय, पार्श्वसंगीत क्षेत्रात ११०० हून अधिक पारितोषिके मिळाली आहेत. भारतीय व अमेरिकन एजन्सीसाठी अनेक हिंदी व इंग्लिश ॲनिमेशनपटांचे लेखन केलेले आहे. यावेळी श्री.नार्वेकर व अस्मिता पांडे यांनी लेखन, अभिवाचनाबाबत स्पर्धकांना मार्गदर्शन केले.

अभिवाचन स्पर्धेसाठी प्राथमिक फेरीमधील स्पर्धकांपैकी अंतिम फेरीसाठी ११ स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. यापैकी १४ जानेवारी २०२१ रोजी  सहभागी  झालेल्या स्पर्धकांची अंतिम फेरीतून निवड केली जाईल. व २८ जानेवारी २०२१ रोजी  म्हणजे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या शेवटच्या दिवशी बक्षीस वितरण सोहळा मंत्रालय येथे होणार आहे. यावेळी मराठी भाषा विभागाचे मंत्री यांच्या हस्ते पहिले ३ बक्षिस व २ उत्तेजनार्थ बक्षीसे देण्यात येणार आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आजपासून ट्रम्प यांच्या इमर्जन्सी टॅरिफची वसुली बंद:₹16 लाख कोटी परत करावे लागू शकतात; कोर्टाने 3 दिवसांपूर्वी बंदी घातली

अमेरिकन सरकार आजपासून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी लादलेल्या आपत्कालीन शुल्काची...

कॉम्रेड अंजलीताई महाबळेश्वरकर यांचे निधन:’लाल सलाम’च्या घोषणेत अखेरचा निरोप; मरणोत्तर नेत्रदानाचा आदर्श

सातारा -सातारा नगरपालिकेच्या माजी नगरसेविका व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या...

शिक्षणाचा वारसा जपत माजी विद्यार्थ्यांची आजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेट

कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा आनंद मेळा उत्साहात पुणे...