पुणे- लोकपाल आणि लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीसाठी,आणि सुराज्याच्या निर्मितीसाठी , दिल्ली तील रामलीला मैदानावर पुन्हा आंदोलन होणार ..पण यापुढे भोंदू ,लुटारू ,हौशे नवशे नसतील ..तर चारित्र्यवान लोकांचे आंदोलन होईल .असे येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले .
कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही , गैरफायदा घेवून गैरकृत्य करणार नाही , चारित्र्य जपेल असे प्रतिज्ञापत्र करून देणारी १ लाख लोकं ज्यावेळी जमतील तेव्हा हे आंदोलन होईल .काँग्रेस सरकारच्या काळात मोठ्ठे आंदोलन आपण रामलीला मैदानावर केले पण …काही लोकं माझ्याभोवती फिरून स्वार्थासाठी आंदोलनाचा दुरुपयोग करतील याची मला कल्पना नव्हती . त्यामुळे टीम अण्णा तुटली .आता मी सावध झालो आहे . त्यामुळे यापुढे अशी लोकं आंदोलनात नसतील यासाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र करून घेणार आणि नंतरच आंदोलनात सहभागी करून घेणार . आतापर्यंत अडीच हजार नागरिकांनी असे प्रतिज्ञापत्रे जमा केली आहेत . हि संख्या १ लाख होईल तेव्हा पुन्हा ‘रामलीला मैदानावर सुराज्यासाठी आणि लोकपाल -लोकायुक्त अंमलबजावणीसाठी आपण आंदोलन करू असे अण्णा म्हणाले …
पहा आणि ऐका नेमके अण्णा काय म्हणाले ……

