भाजपला सत्तास्थापनेचं निमंत्रण द्या; रामदास आठवलेंची राज्यपालांकडे मागणी

Date:

मुंबई: राज्य विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन आठवडा उलटला तरी, अद्याप सरकार स्थापन झालेलं नाही. त्यामुळं राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सरकार स्थापन करण्याचं निमंत्रण द्यावं, अशी विनंती केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीतील मित्रपक्षांच्या वतीनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडं केली. शिवसेनेनं उपमुख्यमंत्रिपद आणि १६ मंत्रिपदं घेऊन भाजपशी तडजोड करून सरकारमध्ये सहभागी व्हावं असे आवाहन हि यावेळी त्यांनी केले .केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात राज्यपालांना भेटलेल्या शिष्टमंडळात रासपचे प्रमुख महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, शिवसंग्रामचे संदीप पाटील, रिपाइंचे सरचिटणीस अविनाश महातेकर, सुमंतराव गायकवाड, भुपेश थुलकर, गौतम सोनवणे, सुरेश बारशिंग, एम. एस. नंदा, जगदीश गायकवाड, हेमंत रणपिसे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आठवले यांनी राज्यातील सरकार स्थापनेबाबत महत्वाचं विधान केलं. निकाल जाहीर होऊन आठवडा उलटला तरी अद्याप सरकार स्थापन झालेलं नाही. त्यामुळं राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण द्यावं, अशी विनंती आठवले यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे केली.येत्या १० नोव्हेंबरपर्यंत राज्यात सरकार स्थापन होणे आवश्यक आहे. तसे झाले नाहीतर राष्ट्रपती राजवट नियमानुसार लागू होऊ शकते यात राष्ट्रापती राजवट लागू करण्याची कोणतीही धमकी नाही, असं मत आठवले यांनी मांडलं. राज्यात सरकार लवकर स्थापन झालं पाहिजे. मात्र अद्याप माझ्याकडं कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असं राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितलं.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबई प्रमाणे पुण्यातही 500 चौ. फू . घराला मिळकत कर शून्य करा- स्थायी च्या पहिल्या बैठकीत कॉँग्रेस चा प्रस्ताव

ऐतिहासिक निर्णयाबाबतचा चेंडू आता अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंच्या मैदानात...

सोलर एनर्जी प्रकल्प वापरणाऱ्यांना मिळकत करात 10 टक्के सवलत द्या – दुधाने आणि मानकर यांचा प्रस्ताव

पुणे-सोलर एनर्जी प्रकल्प, म्हणजेच सूर्यप्रकाशाद्वारे वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प...

प्रदूषणाने कॅन्सर; महाराष्ट्र सरकारची कबुली, 57% रुग्णांचे फुफ्फुस ‘आजारी’, राज्य सरकारच्या अभ्यासात मोठा खुलासा

बांधकामांच्या ठिकाणचे धुळीचे लोट रोखण्यासाठी मोहीम ही देवेंद्र फडणविसांची...