रक्षाबंधनानिमित्त पुणे कॅम्प मधील लष्कर पोलीस ठाण्याच्या आवारात पूना कॉलेज कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी वृक्षांना राख्या बांधून पर्यावरण वाचवा , वृक्ष वाचवा हा संदेश दिला . विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्या आणून वृक्षांना बांधल्या . यावेळी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे , सहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभागाचे निलेश मोरे , लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत कुंवर , गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे , पूना कॉलेज कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. रफीक सरकवास , डॉ . अफताब अन्वर , पुणे कॅण्टोन्मेट शांतता समितीचे सदस्य प्रविण गाडे , विजय भोसले , माजी नगरसेविका संगीता पवार , शानी नौशाद , प्रमिला जंगम , भारती अंकलेल्लू , नितीन गाडे आदी मान्यवर व शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते .
या कार्यक्रमामध्ये पूना कॉलेज कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी वसुधा व्हावळ , इम्तियाझ आलम , विद्यार्थी मनाली घाडगे , जीविता चव्हाण , राजिता घाडगे , निनाक्षी झुंबरे , सुरज देवकर , सुजित लोखंडे , मोमीन इप्तीसाम आदींनी विशेष परिश्रम घेतले .

