विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी राजू इंगळे;कार्यवाहपदी सुनील चोरे

Date:

खजिनदारपदी संतोष घारे, उपाध्यक्षपदी अनिल खेतमाळीस, अलकनंदा पाटील
पुणे : विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी जगन्नाथ उर्फ राजू इंगळे यांची निवड करण्यात आली. कार्यवाहपदी सुनील चोरे, खजिनदारपदी संतोष घारे, उपाध्यक्षपदी अनिल खेतमाळीस, अलकनंदा पाटील, सहकार्यवाह व माजी विद्यार्थिनी समन्वयक म्हणून मनीषा गोसावी, तर सहखजिनदार व माजी विद्यार्थी समन्वयक म्हणून गणेश काळे यांची निवड झाली. समितीचे विश्वस्त रमाकांत तांबोळी यांची मंडळाच्या मानद सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली.

मंडळाच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली. या पदाधिकाऱ्यांसमवेत माजी विद्यार्थी जीभाऊ शेवाळे, दिनकर वैद्य, मनोज गायकवाड, डॉ. अभय व्यवहारे, निसार चौगुले, रेवती गटकळ, शंकर बारवे, ऍड. देविदास टिळे, जीवराज चोले यांची सदस्य म्हणून निवड झाली. मावळते अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी यांच्याकडून निर्वाचित अध्यक्ष इंगळे यांनी पदभार स्वीकारला.

कुंदन पठारे, श्रुती साने, गजानन देशपांडे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. विद्यार्थी साहाय्यक समितीचे कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, ज्येष्ठ सदस्य रत्नाकर मते, हरीश बुटले, डॉ. प्रसाद आंबीकर, तुषार रंजनकर, ज्ञानेश्वर खैरे, संदीप इंगवले व अन्य माजी विद्यार्थी, पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...