भारत वंशीय राजा कृष्णमूर्ती यांनी प्रायमरी निवडणूक जिंकली, म्हणाले – कोरोना व्हायरसपासून अमेरिकी नागरिकांना वाचवणे माझे प्रथम ध्येय

Date:

वॉशिंग्टन : भारत वंशीय खासदार राजा कृष्णमूर्ती इलिनॉय येथून डेमोक्रेटिक पार्टीची प्रायमरी निवडणूक जिंकले आहेत. त्यांनी 80% मते मिळवली आहेत. हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजसाठी आता त्यांची उमेदवारी निश्चित आहे. कृष्णमूर्ती यांचे निकटतम प्रतिस्पर्धी विलियम ओल्सन केवळ 13% मतेच मिळवू शकले. विजयानंतर आपल्या समर्थकांना पाठवलेल्या ईमेलमध्ये त्यांनी म्हणले आहे, ‘‘परत निवडणूक जिंकल्यास मी तुमचे मुद्दे काँग्रेस संसदेत मांडेन. आता आपण कोरोना व्हायरस महामारीशी लढत आहोत. मी तुम्हाला आणि सर्व अमेरिकन्सला सुरक्षित ठेवण्यासाठी काहीही करेन. हे ध्येय माझी पहिली प्राथमिकता असेल.’’

प्रायमरीमध्ये विजयानंतर आता कृष्णमूर्ती सलग तिसऱ्यांदा संसदीय निवडणूक लढणार आहेत. यादरम्यान 17 मार्चला होणारी रिपब्लिक पार्टीची निवडणूक कोरोना व्हायरसमुळे रद्द केली गेली आहे.

कृष्णमूर्ती भारत-अमेरिका संबंधांचे समर्थक…

कृष्णमूर्ती अमेरिकी खासदारांची पर्मनंट सिलेक्ट कमेटी ऑन इंटेलिजन्सचे सदस्य आहेत. मागच्यावर्षी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध आणल्या गेलेल्या महाभियोगदरम्यान त्यांनी पार्टीचा पक्ष कणखरपणे ठेवला होता. यामुळे अमेरिकन संसदेत त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली. ते इकोनॉमिक अँड कन्झ्युमर पॉलिसी सब-कमिटीचे चेअरमनदेखील आहेत. कृष्णमूर्ती भारत आणि अमेरिका संबंधांचे समर्थक आहेत. अनेक परदेश नीति आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रकरणांवर होणाऱ्या चर्चांमध्ये सामील होतात.

कृष्णमूर्ति बराक ओबामा यांचे सल्लागारही होते…

राजा कृष्णमूर्ती यांचा जन्म 19 जुलै 1973 ला नवी दिल्लीमध्ये झाला होता. ते केवळ तीन महिन्यांचे होते जेव्हा त्यांचे माता-पिता अमेरिकेला स्थायिक झाले. राजा कृष्णमूर्ती 2004 आणि 2008 च्या निवडणुकीत माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांचे सल्लागार होते. कृष्णमूर्ती व्यवसायाने वकील आणि इंजीनिअर आहेत. इलिनॉयमध्ये 21% भारत वंशी – अमेरिकन्सची संख्या बऱ्यापैकी आहे. 2016 मध्ये झालेल्या काँग्रेसनल निवडणुकीमध्ये कृष्णमूर्ती यांना 57% वोट मिळाले होते. त्यांचे प्रतिस्पर्धी सीनेटर न्यूलँडला 29 आणि देब बुलविंकेल यांना 13% मते मिळाली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...