पुणे – शहरात प्रत्येक प्रभागामध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारल्यास कचरा डेपोंचा प्रश्न उरणार नाही. नगरसेविका वनिता वागसकर आणि नगरसेवक बाबू वागसकर यांनी प्रभाग कचरा मुक्त करण्यासाठी उभारलेले प्रकल्प हे त्याचेच उदाहरण आहे, असे मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी पुण्यात व्यक्त केले. ते प्रभाग क्र. २१ कोरेगाव पार्कमध्ये महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या ‘अवनी नवनिर्मिति केंद्र’ या कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे उदघाटन प्रसंगी बोलत होते.आज दिनांक २१ रोजी नगरसेवक राजेंद्र ( बाबू ) वागसकर आणि नगरसेविका वनिता राजेंद्र वागसकर यांच्या विशेष प्रयत्नांतून बांधण्यात आलेल्या ” अवनी नवनिर्मिती केंद्र ” या विविध कचरा विषयक प्रकल्पाचे उदघाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रकल्पामुळे प्रभागातील कचरा प्रभागातच जिरवण्यास मदत होणार आहे .
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, की कचरा समस्येवर चर्चा करण्यापेक्षा कृती आवश्यक आहे. नागरिकांनी सहकार्य केल्यास हा प्रश्न सुटू शकतो याचे आदर्श उदहारण वागसकर यांनी घालून दिले आहे. शहरातील लोकप्रतिनिधींनीं या ठिकाणी उभरलेले प्रकल्प पाहून आपल्या प्रभागात असे प्रकल्प उभारल्यास कचऱ्याची समस्या सुटण्यास वेळ लागणार नाही असे पालकमंत्री गिरीष बापट यांनी सांगितले.
नगरसेविका वनिता वागसकर यांनी यावेळी कोरेगाव पार्क येथे सुमारे ३५ गुंठे जागेत ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचे ६ टन क्षमतेचे २ प्रकल्प, गार्डन वेस्टवर प्रक्रिया करण्यासाठी श्रेडर मशीन आणि त्यापासून ब्रिक्स करण्याची यंत्रणा, सैनेटरी नॅपकिन डिस्पोजल यंत्रनेच्या कार्यपद्धतीची माहिती यावेळी प्रमुख पाहुण्यांना दिली.
यावेळी पालकमंत्री गिरीष बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे , माजी सनदी अधिकारी दिलीप बंड, मनसेचे सिरचिटणीस अनिल शिदोरे, बाळा शेडगे, नगरसेवक किशोर शिंदे, सुशीला नेटके, नीलम कुलकर्णी, लक्ष्मी घोडके, सुनीता साळुंखे, विनीता ताटके, सह आयुक्त सुरेश जगताप आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
वार्डातला कचरा वार्डातच जिरवा- डेपो हवाय कशाला ? राज ठाकरे
Date:





