राज ठाकरेंनी रमजान ईद नंतर सभा घ्यावी -औरंगाबाद पोलिसांची सूचना

Date:

औरंगाबाद – राज ठाकरेंच्या सभेला पैसे देऊन लोकं आणावे लागतील, असा टोला शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी लगावला आहे.तर दुसरीकडे राज ठाकरेंनी रमजान ईद नंतर सभा घ्यावी आणि तिसरीकडे 1 मे रोजी औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर जाहीर सभा तर होणारच अशी भूमिका मनसे ने घेतल्याचे वृत्त आहे. औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या (मसांमं) आजूबाजूला मुस्लिम वसाहती आहेत. अनेक संघटनांनी विरोधही दर्शवला आहे. शिवाय वाहतुकीची समस्या आहेच, अशी कारणे दाखवून 1 मे रोजी होणारी मनसेची राज ठाकरेंची सभा चिकलठाणा एमआयडीसीतील गरवारे स्टेडियमवर घ्यावी, अशीही ऑप्शन ऑफर पोलिसांनी दिली आहे. मसांमंवरच सभेचा राजहट्ट असेल तर किमान तारीख 3 मेनंतरची म्हणजे रमजान ईदनंतरची निवडा, असेही त्यांचे म्हणणे आहे. मात्र, दोन्ही ऑफर स्वीकारण्यास मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सध्या तरी नकार दिला आहे.

चंद्रकांत खैरेंनी असे म्हटले आहे कि,’ राज ठाकरेंच्या आधीच्या मेळाव्यात 300 रुपये देऊन लोकांना जमा करण्यात आले होते. भाजप आणि मनसेची आता युती होणार आहे. त्यामुळे मनसेला हे सपोर्ट करण्याचे काम करत आहे. ते आता सिद्ध व्हायला लागलं आहे. सभेसाठी लोकं येतात, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या सभेला लोकं स्वत:हून आलेले आहेत. लोकं पैसे, गाड्या देऊन सभेसाठी नाही आले. राज ठाकरेंनी गेला मेळावा घेतला होता, त्यात लोकांनी आम्हाला सांगितले की, आम्हाला 300 रुपये देऊन आणण्यात आले. झोपडपट्टीवासियांना आम्ही हे देतो, आम्ही ते देतो सांगितले, पुढे काय दिले, असा सवाल देखील चंद्रकांत खैरेंनी विचारला आहे.

राज ठाकरेंच्या सभेची तारीख बदला, अशा सुचना औरंगाबाद पोलिसांनी दिल्या आहेत. नियोजित जागी सभा घ्यायची असल्यास तारीख बदलण्याची सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. रमजान ईदनंतर 3 मे च्या नंतर राज ठाकरेंची सभा औरंगाबादला घ्यावी, अशा सूचना पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.मनसे प्रमुख राज ठाकरे 1 मे रोजी औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर जाहीर सभा घेणार आहेत. मनसेने त्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली असली तरी अद्याप त्याबाबत निर्णय झालेला नाही. स्थानिक पोलिसांनी मुंबईतील वरिष्ठांकडे हे प्रकरण सोपवले आहे. एकही वरिष्ठ अधिकारी याबाबत माध्यमांशी बोलण्यास तयार नाही. दुसरीकडे, परवानगी मिळो अथवा न मिळो, सभा तर होणारच, असा निर्धार मनसैनिकांनी केला आहे. बुधवारी पक्षाच्या नेत्यांची मैदानाची पाहणी करून आढावा बैठक घेतली. 80 हजार क्षमता असलेल्या या मैदानावर 1 लाख 20 हजार प्रेक्षक जमवण्याची तयारीही मनसेने केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सभेला वाढता विरोध पाहता सभेच्या अखेरच्या क्षणी पोलिस सभेच्या परवानगीसंदर्भात निर्णय देतील.


SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...