काही महिला कलाकारांमुळेच झाला राज कुंद्राचा असा पर्दाफाश

Date:

आधी कॉल, नंतर ऑडिशनच्या नावाखाली बोल्ड सीन्स…अशी होती राज कुंद्राची मोडस ऑपरेंडी!

मुंबई-सोमवारी रात्री मुंबई पोलीस क्राईम ब्रांचनं अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणामध्ये अटक केली आहे. या प्रकरणावरून काल रात्रीपासून चित्रपट क्षेत्रासोबतच मुंबईच्या बी टाऊनमध्ये मोठी खळबळ माजली आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईच्या मढ परिसरातील एका बंगल्यावर छापा टाकल्यानंतर अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणाचा पर्दाफाश झाला होता. या प्रकरणी क्राईम ब्रांचनं राज कुंद्राला अटक केल्यानंतर आज संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कशा पद्धतीने या अश्लील चित्रफिती शूट केल्या जायच्या आणि विकल्या जायच्या, याची मोडस ऑपरेंडीच सांगण्यात आली आहे.

आधी वेब सीरिजच्या आमिषाने बोलवलं जायचं…

क्राईम ब्रांचकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या नवोदित महिला कलाकारांना वेब सीरिजमध्ये किंवा एखाद्या शॉर्ट स्टोरीजमध्ये ब्रेक देतो असं सांगून बोलावलं जायचं. ऑडिशन, शॉट्स घेण्यासाठी बोलावलं जायचं. त्यात बोल्ड सीन्स करावे लागतील असं सांगितलं जायचं. नंतर त्या बोल्ड सीन्सचं पर्यवसान सेमी न्यूड आणि न्यूड सीन्समध्ये व्हायचं. त्यावर या महिला कलाकार आक्षेप घ्यायच्या. अशा काही महिला कलाकार क्राईम ब्रांचला अप्रोच झाल्या. त्यांच्या तक्रारींवरूनच हा गुन्हा दाखल करण्यात आला.

वेबसाईट्स, मोबाईल अॅप्सला क्लिप्स विकल्या जायच्या…

शा प्रकारे छोट्या क्लिप्स, शॉर्ट फिल्म्स काही वेबसाईट्स आणि मोबाईल अॅप्सला विकल्या जात होत्या. यात ९ आरोपी आधीच अटकेत आहेत. त्यात रोहा खान, गेहेना वशिष्ट, तन्वीर हाशमी, उमेश कामत आणि इतरही काही आरोपी अटकेत आहेत. यातले काही प्रोड्युसर देखील आहेत. त्यांचे वेगवेगळे अॅप्स आणि वेबसाईट असायच्या. तिथे या क्लिप्स विकल्या जायच्या.

सर्व कामकाज उमेश कामत पाहायचा…

जे अॅप्स सापडले, त्याच्या तपासात असं समोर आलं की उमेश कामत नावाचा व्यक्ती हा इंडिया हेड आहे. राज कुंद्रा यांच्या कंपनीत तो भारतातील कामकाज बघायचा. त्यात खोल तपास केला असता असं निष्पन्न झालं, की राज कुंद्रा यांच्या वियान कंपनीचं केनरीन नावाच्या कंपनीशी टायअप आहे. ही कंपनी लंडन स्थित आहे. राज कुंद्रा यांच्या बहिणीचे पती त्या कंपनीचे मालक आहेत. या कंपनीचं हॉटशॉट्स नावाचं अॅप होतं. ही कंपनी जरी लंडनमध्ये असली, तरी त्याचा कंटेंट तयार करणं, त्याची व्यवस्था पाहणं हे मुंबईतून वियान कंपनीमधूनच केलं जायचं.

रायन थॉर्प हा राज कुंद्राच्या कंपनीचा आयटी हेड!

हे सर्व धागेदोरे सापडले, त्यांचे काही व्हॉट्सअॅप ग्रुप सापडले, इमेल सापडले आहेत, अकाउंटिंग शीट्स सापडल्या आहेत. हॉटशॉट्सवरच्या काही चित्रफीत देखील सापडल्या आहेत. कोर्टाच्या परवानगीने त्यांच्या ऑफिसमध्ये शोध घेतल्यानंतर हे सर्व साहित्य सापडलं. म्हणून तपासानंतर राज कुंद्रा आणि त्यांचे आयटी हेड रायन थॉर्प यांना अटक केली आहे.

अॅपल आणि गुगल प्ले स्टोअरवरू हॉटशॉट अॅप काढण्यात आलं…

पुढचा तपास सुरू आहे. हॉटशॉट्स नावाच्या अॅपवर पॉर्नोग्राफीक कंटेंट असल्यामुळेच अॅपल स्टोअरने जून २०२०मध्ये काढून टाकलं होतं. नोव्हेंबर २०२०मध्ये गुगल प्लेस्टोअरने देखील हे अॅप काढलं आहे.

कोण आहे राज कुंद्रा?

 मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अ‍ॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याच प्रकरणात राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

तसे पाहता, राज कुंद्रा वादात अडकल्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी तो आयपीएलच्या सट्टेबाजीत दोषी आढळला होता. राजस्थान रॉयल्सचा सह-मालक असलेल्या राज कुंद्राने काही वर्षांपूर्वी आयपीएल सामन्यादरम्यान सट्टेबाजी केल्याची कबुली दिली होती.

राज कुंद्रा देशातील प्रसिद्ध नाव आहे. भारतात लोक त्याला बिझनेसमनहून अधिक अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा म्हणून अधिक ओळखतात. एका मुलाखतीत राज कुंद्राने म्हटले होते की, ‘आज मी सुखी आणि आरामदायक आयुष्य जगत आहे. मात्र माझे बालपण अगदी याउलट होते.’

वयाच्या 18व्या वर्षी सुरु केला स्वतःचा व्यवसाय…
एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या राज कुंद्राचे बालपण हलाखीच्या परिस्थितीत गेले. राज कुंद्राचे वडील कृष्ण कुंद्रा हे लुधियानामधून लंडनमध्ये स्थायिक झाल्यानंतर लंडनमध्ये राजचा जन्म झाला. कृष्ण कुंद्रा हे लंडनमध्ये बस कंडक्टर म्हणून काम करायचे. तर आई राणी कुंद्रा शॉप असिस्टंट म्हणून नोकरी करायच्या. नंतर राजच्या वडिलांनी एक रेस्टांरंट सुरु केले. राज कुंद्राने वयाच्या 18व्या वर्षीच शिक्षण सोडले होते. वयाची 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर त्याला त्याच्या वडिलांनी म्हटले की, एकतर आमचे रेस्टांरंट चालव, किंवा स्वतःचे काम सुरु कर. आईवडिलांचे म्हणणे त्याने गांभीर्याने घेतले आणि कामाला सुरुवात केली.

शॉल विकून सुरु केला होता बिझनेस

काही पैसे घेऊन राज दुबईत गेला. हि-यांच्या व्यापा-यांची भेट घेतली. मात्र तेथे त्याला काम मिळाले नाही. तेथून राज नेपाळला गेला. तेथे पश्मिना शॉल खरेदी केल्या आणि ब्रिटेनमधील काही ब्रॅण्डेड स्टोअरच्या मदतीने त्याची विक्री सुरु केली. अल्पावधीतच त्यांचा बिझनेस वाढू लागला. हा व्यवसाय सुरळीत सुरु झाल्यानंतर राज हि-यांचा व्यापार करण्यासाठी पुन्हा दुबईत गेला. तेव्हापासून त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. आज वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांच्या 10 कंपन्या आहेत. 2004 मध्ये एका ब्रिटीश मॅगझिनने त्याला सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत 198 वे स्थान दिले होते. राजने 2020 मध्ये मुंबईत एक रेस्टांरंट उघडले आहे. याआधीही त्याच्याकडे मुंबईत एक रेस्टांरंट आहे, जे बरेच प्रसिद्ध आहे. इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार त्याच्याकडे 2800 कोटींची संपत्ती आहे

दुसरी पत्नी आहे शिल्पा

राजने दोनदा लग्न केले. त्याचे पहिले लग्न कविता कुंद्राशी झाले होते. काही वर्षानंतर दोघेही वेगळे झाले. यानंतर राजने 22 नोव्हेंबर 2009 रोजी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीशी लग्न केले. त्यांना मुलगा विवान आणि मुलगी समिशा अशी दोन मुले आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक धनकवडे उद्या करणार भाजपात प्रवेश

पुणे-केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या...

पुणे, पिंपरीत भाजपचा महापौर होईल,भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील-मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे -आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील,...

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...