Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मोदी सरकारच्या चूकीच्या आर्थिक धोरणाच्या विरोधात जनतेमध्ये जनजागरण करा – भुपेश बघेल, मुख्यमंत्री – छत्तीसगड

Date:

पुणे -शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज काँग्रेस भवन येथे छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांचे स्वागत करण्यात आले. क्रांतीसूर्य, समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची प्रतिमा, शाल व पुष्पगुच्छ देवून त्यांचा सन्मान शहराध्यक्ष रमेश बागवे व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव, पश्चिम महाराष्ट्राच्या सहप्रभारी श्रीमती सोनल पटेल यांच्या हस्ते करण्यात आला.

     उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री भुपेश बघेल म्हणाले की, ‘‘पुणे हे छत्रपती शिवाजमहाराज, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळकृष्ण गोखले यांची जन्मभूमी आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत पुण्याचे मोठे योगदान आहे. आपण सर्वांनी मला या ऐतिहासिक काँग्रेस भवनमध्ये बोलावून माझा सत्कार केला त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी या ऐतिहासिक वास्तूला ‘‘यह मकान सच्चे खिदमतगार/सेवको का बना रहे’’ असा शुभसंदेश दिला होता. काँग्रेस  पक्षाला इतिहास आहे. काँग्रेस पक्षातील नेत्यांच्या खंबीर नेतृत्वामुळे आज देशाची प्रगती झाली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार सभासद नोंदणी अभियान देशभर राबविले जात आहे. काँग्रेस  पक्ष मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी या सभासद नोंदणी अभियानामध्ये भाग घेवून जास्तीत जास्त सभासद नोंदवावे. पं. जवाहरलाल नेहरू यांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर देश मजबूत करण्यासाठी अनेक धाडसी पाऊल उचलले. लाल बहाद्दूर शास्त्री यांनी जय जवान, जय किसानचा नारा दिला. स्व. इंदिराजी गांधी यांनी गरीबी हटावचा नारा दिला आणि देशात हरित क्रांती घडविली. राजीव गांधी, नरसिंहराव आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या दूरदृष्टीकोनामुळे आज भारत प्रगतशील देश आहे. मोदी सरकारच्या राजवटीत जातीय धर्मामध्ये तेढ निर्माण झालेली आहे. राहुल गांधी यांनी नोटबंदीवर टिका केली होती. त्यांनी सांगितले होते की नोटबंदीमुळे देशाचे फार मोठे नुकसान होणार आहे. काँग्रेस पक्षाने जी.एस.टी.च्या चूकीच्या पध्दतीने केलेल्या अमंलबजावणीला विरोध केला होता. राहुल गांधींनी मोदी सरकारला कोरोना संसर्ग बद्दल संवेदनशील राहण्यास सांगतिले होते परंतु मोदी सरकारने त्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याची किंमत देशातील नागरिकांना मोजावी लागली. उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाची राजवट आहे आणि पंतप्रधान मोदी वाराणसी येथून खासदार म्हणून निवडून आले आहेत. असे असताना सुध्दा कोरोनामध्ये मृत्यू पावलेल्यांचे शव योग्यरितीने अंतसंस्कार न करता गंगेमध्ये फेकून दिले गेले होते ही बाब एक शोकांतिका आहे. खाजगीकरणाच्या नावाखाली सरकारी कार्यालय आणि कारखाने मोदी सरकारने विकायला काढलेले आहेत. बेरोजगार व महागाई आज देशातील ज्वलंत समस्या आहे. या महागाईच्या विरोधात काँग्रेस पक्ष जनतेच्या हितासाठी देशभर आंदोलन करीत आहे. १२ डिसेंबर २०२१ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी तर्फे मोदी सरकारने केलेल्या महागाई विरोधात दिल्लीमध्ये मोठी रॅली आयोजित केली आहे. पक्षाध्यक्षा श्रीमती. सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी व प्रियंकाजी गांधी यांचे हाथ मजबूत करण्यासाठी आपण सर्व काँग्रेसजणांनी काँग्रेस पक्षाचे कार्य समाजातील सर्व घटकांमध्ये पोहचवून मोदी सरकारच्या चूकीची आर्थिक धोरणाबद्दल जनतेमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे.’’

     आपल्या प्रास्ताविकपर भाषणात शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘छत्तीसगड मध्ये १५ वर्ष भारतीय जनता पक्षाचे राज्य होते. भुपेशजी बघेल प्रांताध्यक्ष असताना छत्तीसगड राज्यातील सर्व तालुका व शहरात जावून संघटनेची बांधणी केली. जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या बेताल कारभाराबद्दल जनजागरण केले. प्रसार माध्यमांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षच सत्तेवर येणार परंतु भुपेशजी बाघेल यांनी त्यांचा अंदाज चुकीचा ठरवला. काँग्रेस पक्षाला छत्तीसगडच्या जनतेने स्पष्ट बहुमत दिले आणि काँग्रेस पक्ष सत्तेवर आला.’’

     महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले की, ‘‘भुपेशजी बघेल हे काँग्रेसचे निष्ठावान नेते आहेत. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे छत्तीसगड येथे काँग्रेस पक्ष सत्तेवर आला. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांची निघृण हत्या झाली. त्या हत्तेचा निषेध करून शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी भुपेशजी बघेल उत्तर प्रदेशात गेले. उत्तर प्रदेश सरकारने त्यांना लखीमपुर जाण्यास मनाई केली तेव्हा त्यांनी लखनौ विमानतळावरच उपोषण केले.’’

     ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार म्हणाले की, ‘‘भुपेशजी बघेल यांनी काँग्रेसचा विचार आणि ध्येय धोरण तळागाळापर्यंत पोहचविले. त्यांच्या नेतृत्वाखाली छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार मजबूत आहे. त्यांनी छत्तीसगडच्या जनतेसाठी शासनामार्फत अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. छत्तीसगडचा विकास हेच त्यांचे ध्येय आहे. आज महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी आहे. गांधींना जेव्हा महात्मा म्हणून उपमा दिली त्यावेळी ते म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले हे खरे महात्मा आहेत.’’

     त्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव, पश्चिम महाराष्ट्राच्या सहप्रभारी श्रीमती. सोनल पटेल म्हणाल्या की, ‘‘भुपेशजी बघेल छत्तीसगड काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष असताना पक्षाची शिबीरे घेतली. शिबीराच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेसचे ध्येय धोरण आणि विचार प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत पोहचविले. पक्ष संघटना मजबूत करून त्यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विरूध्द निवडणुकीमध्ये लढा दिला आणि ते यशस्वी ठरले. यातून आपण सर्वांनी हा बोध घेतला पाहिजे की, संघटना मजबूत झाली की सत्ता मिळविण्यास फार सोपे जाते.’’

     यावेळी प्रभारी सोनल पटेल, शहराध्यक्ष रमेश बागवे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, मोहन जोशी, ॲड. अभय छाजेड, वीरेंद्र किराड, अविनाश बागवे, रविंद्र धंगेकर, अजित दरेकर, पुजा आनंद, अनिल सोंडकर, रमेश अय्यर, नीता रजपूत, राजेंद्र शिरसाट, शानी नौशाद, मुख्तार शेख, विशाल मलके, सोनाली मारणे, अमिर शेख, भुषन रानभरे, सुरेखा खंडागळे, अनुसया गायकवाड, ॲड. राजश्री अडसूळ, नलिनी दोरगे, पपिता सोनवणे, सतीश पवार, रमेश सोनकांबळे, राजेंद्र भुतडा, नितीन परतानी, मुन्नाभाई शेख, सुनिल पंडित, घनशाम निम्हण, नारायण पाटोळे,ज्योती अरवेन, मीरा शिंदे, पोर्णिमा बहिरट, शारदा वीर, रजिया बल्लारी, संगिता क्षिरसागर आदींसही असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक अविनाश बागवे यांनी केले तर आभार माजी आमदार दिप्ती चवधरी यांनी मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा ऑपरेशनमध्ये मृत्यू, पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड

पुणे- सह्याद्री रुग्णालयात एका व्यक्तीचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्यामुळे संतापलेल्या...

गोव्यात नाईटक्लबपासून हॉटेल्सपर्यंत सर्व आस्थापनांची होणार सुरक्षा पुनर्तपासणी

“हडफडेची पुनरावृत्ती नाही! गोवा सरकारची कठोर भूमिका; संयुक्त अंमलबजावणी...

शीतल तेजवानीचा आता थेट रणबीर कपूरवर निशाणा!

पुणे-कोरेगाव पार्क , मुंढवा येथील गाजलेल्या 40 एकराच्या सरकारी...