पुणे-राज्यभरात सुरु असलेल्या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. राज्यातील बहुतांश धरणे पूर्ण भरली असून, त्यामधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. धरणांमधून पाणी सोडले जात असल्याने परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह राज्याला पाणीपुरवठा करणारी धरणेदेखील पूर्णपणे भरली आहेत. त्यामुळे वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
खेड तालुक्यातील चास कमान धरण परिसरात आज ६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर आज अखेर धरण क्षेत्रात ९७९ मिलीमिटर इतका पाऊस पडला आहे. काल दि.१९ संध्याकाळी व आज दि.२० पहाटे पासून संततधार पाऊस सुरु आहे भोरगिरी, भीमाशंकर परिसरात पडत असलेल्या पावसामुळे चास कमान धरणातून ५९९३ क्युसेस वेगाने भिमानदीत, ५५० क्युसेक वेगाने पाणी डाव्या कालव्यात तर ३०० क्युसेस वेगाने पाणी वीजनिर्मिती केंद्रातून भिमानदीत सोडण्यात येत आहे. तालुक्यातील चास कमान धरण क्षेत्रात पावसाची आणि धरणसाठ्याची माहिती पुढील प्रमाणे:
· धरणपातळी -५४९.५३· एकूण पाणी साठा – २४१.६९ दशलक्ष घनमीटर.· उपयुक्तपाणी साठा – २१४.५० दशलक्ष घनमीटर.· टक्केवारी -१०० टक्के.· विसर्ग – ५९९३ क्युसेस वेगाने सांडव्याद्वारे भिमानदीत, ५५० क्युसेस वेगाने डावा कालवा, ३०० क्युसेस वेगाने वीजनिर्मिती केंद्रातून नदीपात्रात· धरणक्षेत्रातील आजचा पाऊस – ६ मिलीमीटर.· धरणक्षेत्रातील आतापर्यंतचा पाऊस – ९७९ मिलीमीटर· तालुक्यातील सरासरी पाऊस ८०७ मिलीमीटर.
इंदापूर तालुक्यातील उजनी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. आज (बुधवारी दि,२०) रोजी दुपारी १२ वाजता धरण १०७. ५१% भरले आहे त्यामुळे उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यात वाढ करण्यात आली असून, धरणाचे १५ दरवाजे उघडण्यात आल्यामुळे नदीकाठच्या गावांसह पंढरपूर शहराला पुराचा धोका वाढला आहे.सध्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या पावसामुळे उजनी धरणातून १५ मोऱ्यांतुन ४० हजार क्यूसेस एवढा पाण्याचाविसर्ग सोडण्यात आलेला आहे. तसेच वीर धरणामधून नीरा नदीत जवळपास २० हजार क्यूसेस पाण्याची त्यात भर पडत आहे. त्यामुळे पंढरपूर येथील चंद्रभागेत ६० हजार क्यूसेस पेक्षा अधिक वेगाने पाणी वाहते आहे. वरील भागातून येणाऱ्या पाण्यात आणखी झपाट्याने वाढ झाल्यास विसर्ग वाढू शकतो. त्याचा तडाखा पंढरपूरला बसू शकतो. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. उजनी धरणात १०७ . ५१ टक्के पाणीसाठा आहे यात झपाट्याने वाढ होत आहे. पुर सदृश्यस्थिती निर्माण होवु नये म्हणून उजनी प्रशासनाने आज (बुधवारी दि,२०) एकूण ४१ मोऱ्यांपैकी १५ मोऱ्यांमधुन चाळीस हजार क्यूसेकने पाणी भिमा नदित सोडण्यात आले आहे…धरण क्षेत्रात मोठ्याप्रमाणावर पाऊस झाल्याने पाण्याचा विसर्ग वाढविला..धरणाच्या खोऱ्यात पावसाने मुसंडी मारल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय.उजनी धरणाची पाणी पातळी ४९७ .१६५ दशलक्ष घनमिटर-एकूण पाणीसाठा – ३४३३ ९६ दशलक्ष घनमीटर-उपयुक्त साठा- १६३१ .१५ दशलक्ष घनमीटर-टक्केवारी – १०७ .५१ %
सिना माढा बोगद्यातुन ४ ०० क्यूसेकने तर कालव्यातुन १८०० क्यूसेक व वीजनिर्मिती प्रकल्पासाठी १५०० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तर भिमा नदित दौंडवरुन ६८८१ विसर्ग सुरु असून बंडगार्डन हुन २१२७७ विसर्ग सुरु आहे. भिमा नदिकाठच्या नागरिकांना उजनी व्यवस्थापन विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुण्यात पावसाची संततधार आजही दिवसभर कायम होती. यामुळे सलग तिसर्या दिवशी पुणेकरांनी चिंब पावसाळी दिवसाचा अनुभव घेतला. शहरासह उपनगरातही दमदार पाऊस बरसला. दिवसभर सूर्याचे दर्शनही झाले नसल्याने वातावरणातील गारठा वाढला होता. सायंकाळी ५.३०वाजेपर्यंत शहरात (शिवाजीनगर) ११.९ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली. पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साठल्याने त्यातून वाट काढत जाणार्या वाहनचालकांचे प्रचंड हाल झाले. पावसाचे पाणी साठल्यामुळे वाहतुकीचा वेगही कमालीचा मंदावला होता. काही ठिकाणी सिग्नल बंद पडल्याने वाहतूक कोंडीही झाली. शहराप्रमाणेच शहराला पाणीपुरवठा करणार्या सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही बुधवारी दमदार पाऊस पडल्याने धरणातून पाणी सोडण्यात आले. शहरात बुधवारी २३.३ अंश सेल्सिअस कमाल व २१.७ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. दि. १ जूनपासून आतापर्यंत शहरात ६६०.६ मि.मी पावसाची नोंद झाली असून सरासरीच्या तुलनेत तो तब्बल १५५.४ मि.मी ने अधिक आहे. दरम्यान, येत्या २४ तासांत शहर व परिसरात पावसाची संततधर कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्त