पुणे-श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर त साईनगर शिर्डी दरम्यान विशेष गाडी सुरु करण्यात येत असून कोल्हापूर-शिर्डी मार्गावर 27 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान ही गाडी धावणार आहे. तर शिर्डी-कोल्हापूर मार्गावर 28 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान ही गाडी धावणार आहे.
गाडी क्रमांक (01409) ही गाडी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर वरून दर बुधवारी दुपारी 4.35 वाजता सुटेल आणि दुस-या दिवशी पहाटे 5.55 वाजता साईनगर शिर्डी स्थानकावर पोहोचेल. कोल्हापूर-शिर्डी दरम्यान गाडी हातकणंगले, मिरज, सांगली, कराड, सातारा, लोणंद, पुणे, दौंड, अहमदनगर, बेलापुर, पुणतांबा स्थानकांवर थांबणार आहे. ही गाडी पुणे रेल्वे स्थानकावर रात्री 11.25 वाजता येणार आहे.
गाडी क्रमांक (01410) ही गाडी साईनगर शिर्डी वरून दर गुरुवारी सकाळी 8.25 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 9.25 वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर रेल्वे स्थानकावर पोहोचेल. शिर्डी-कोल्हापूर दरम्यान गाडी पुणतांबा, बेलापूर, अहमदनगर, दौंड, पुणे, लोणंद, सातारा, कराड, सांगली, मिरज आणि हातकणंगले या स्थानकांवर थांबणार आहे.
या गाडीसाठी सोमवार (दि. 25 सप्टेंबर) पासून आरक्षण सुरु होणार आहे

