पुणे- मोदी सरकार रेल्वे कामगारांच्या विरोधी असून रेल्वे कामगारांना आपल्या न्याय हक्कासाठी या सरकार विरोधात वेळ आली तर मोठा लढा उभारावा लागेल , असे आवाहन सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष डॉ. आर. पी. भटनागर यांनी यांनी केले . घोरपडी येथील डिझेल लोको शेडमध्ये सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या पुणे विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रे रेल्वे कामगारांच्या ते बोलत होते . त्यांनी सांगितले कि , भारताला जोडणारी रेल्वे हि सर्वांची जीवनवाहिनी आहे . परंतु आताच्या सरकार रेल्वे कामगारांच्या मागण्या ऐकायला तयार नाही , केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू याना देखील २० नोव्हेंबर २०१५ रोजी आपल्या मागण्याचे निवेदन दिले आहे . त्यासाठी सरकारशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला परंतु , सरकारने अद्याप त्यावर कोणतीच कार्यवाही केली नाही . तसेच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याबरोबर देखील अनेक बैठका झाल्या , त्यासाठी रेल्वे कामगारांनी आता संघटित होऊन सरकार विरोधात आपल्या न्याय हक्कासाठी लढा उभारण्यासाठी सज्ज राहावे . सेंट्रल रेल्वे मजदूर संघ ११ एप्रिल २०१६ रोजी संपावर जाणार होती , परंतु सरकारने आपल्या मागण्यांच्या न्याय हक्कांचा अभ्यास करण्यासाठी चार महिन्याचा कालावधी संघटनेकडे मागितला . त्यामुळे आपला संप स्थगित करण्यात आला . त्यासाठी चार महिन्यांच्या कालावधीमध्ये सरकारने नियुक्त करण्यात आलेली समिती काय निर्णय घेते याकडे संघटना पाहत आहे . भविष्यकाळात रेल्वे कामगारांच्या पदन्नतीसाठी आणि वेतन वाढीसाठी सरकारकडे मागणी करावी लागणार आहे. स्वतंत्र भारतात रेल्वे कामगार गुलामीचे जीवन जगत आहे , त्यासाठी कामगारांनी आता आपल्या मागण्यासाठी एकजूट झाले पाहिजे .
सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे महामंत्री प्रविण वाजपेयी , सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे मुख्यालय उपाध्यक्ष अमित भटनागर , मंडळ अध्यक्ष डी. आर. जमादार , मंडळ सचिव डॉ. एस. पी. सिंग , डिझेल शेड विभागाचे सचिव एच. आर. इटाले , अध्यक्ष बी. एस. आडेकर , महासचिव नासिरखान शिलेदार , कार्याध्यक्ष याशर खान . युवा अध्यक्ष दिलीप वाघ आदी मान्यवर आणि मोठया संख्येने रेल्वे कामगार वर्ग उपस्थित होता.
यावेळी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे सर्व पदाधिकारीचे फेटे घालून शाल , श्रीफळ व पुष्प गुछ देउन स्वागत करण्यात आले . सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे घोरपडी ओपन लाईन शाखेच्या कार्यालयाचे उदघाटन सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष डॉ. आर. पी. भटनागर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे डिझेल शेड विभागाचे अध्यक्ष बी. एस. आडेकर यांनी केले तर आभार सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे सचिव एच. आर. इटाले यांनी मानले .

