पुणे-लॉकडाउनमध्येही सुरू असलेल्या कोंढव्यातील दारू धंद्याचा सामाजिक सुरक्षा विभाग आणि दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे. पथकाने त्याठिकाणी छापा टाकून रोख रकमेसह 4 लाख 32 हजारांच्या गावठी दारूसह विदेशी दारू जप्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुशिला दिलीप कुंभार (वय 60) अरूणा राजकुमार कचरावत (वय 50), अनिल शाम बिनावत आणि राहूल अनिल बिनावत त्यांच्याविरूद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कोंढव्यातील श्रद्धानगरात अवैध दारुविक्री सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना मिळाली होती. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागासह दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. त्याठिकाणी सुशिला आणि अरूणा व अनिल यांच्याकडून गावठी आणि विदेशी दारूसह 4 लाख 32 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. दरम्यान, पोलिस आल्याचे समजातच आरोपी अनिल बिनावत आणि राहूल बिनावत पसार झाले. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके, राजश्री मोहिते, इरफान पठाण, आण्णा माने, नीलम शिंदे, मनीषा पुकाळे, पुष्पेंद्र चव्हाण, प्रफुल्ल गायकवाड, धनंजय ताजणे, प्रमोद मोहिते, मॅगी जाधव, गणेश ढगे, श्रीकांत दगडे यांच्या पथकाने केली.

