Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

ज्येष्ठ नेत्यांना राहुल म्हणाले -डिप्रेशनमध्ये जाऊ नका, लढा खूप मोठा; सोनिया म्हणाल्या -काँग्रेस सत्तेत परतेल

Date:

भारत को जोड़कर, नफरत को तोड़कर ही भारत की होगी विजय। कॉंग्रेसचा पुन्हा एकदा ‘नव संकल्प’

उदयपूर-काँग्रेस जनतेपासून दूर गेली आहे. त्यामुळे शॉर्टकट न घेता सर्वांनी लोकांपर्यंत जावे.लढाई खूप मोठी आहे. त्यामुळे नैराश्यात जाऊ नका. आपल्याला अंतर्गत पद पाहण्यापेक्षा बाहेरील युद्ध लढावे लागेल.-हे युद्ध प्रादेशिक पक्ष लढू शकत नाहीत. ही लढाई केवळ काँग्रेस लढू शकते. प्रादेशिक पक्ष भाजपला पराभूत करू शकत नाहीत. कारण, त्यांच्याकडे विचारधारा नाही. ते वेगळे आहेत. ते पुढे म्हणाले, मला कशाचीच भीती नाही. मी उभ्या आयुष्यात कुणाचा रुपया घेतला नाही. भ्रष्टाचार केला नाही. मी भारत मातेचा एक पैसा चोरला नाही. त्यामुळे मी खरे बोलताना घाबरत नाही. . त्यामुळे मी नेहमीच संघर्ष करतो. असे प्रतिपादन येथे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपल्या ज्येष्ठ आणि सर्वच वयोगटातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केले .

राजस्थानच्या उदयपूरमध्ये सुरू असणाऱ्या काँग्रेसच्या 3 दिवसीय चिंतन शिबिराचा आजचा शेवटचा दिवस आहे. या शिबिरात पक्षाने एक कुटुंब-एक तिकीट, संघटनेत तरुणांना आरक्षण, देशभर पदयात्रा काढण्यासारखे अनेक निर्णय घेण्यात आले. राहुल गांधी यांनी आपल्या समारोपीय भाषणात काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले.

शॉर्टकटने देशाची सत्ता मिळणार नाही

राहुल म्हणाले -सत्ता शॉर्टकने मिळणार नाही. त्यासाठी घाम गाळावा लागेल. तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचावे लागेल. काँग्रेसचा जन्मच मुळात सर्वसामान्य जनतेतून झाला. हाच आपला डीएनए आहे. ही संघटना जनतेतून उभी राहिली आहे. त्यामुळे काँग्रेस पुन्हा जनतेत मिसळेल. ऑक्टोबरमध्ये संपूर्ण काँग्रेस पक्ष जनतेच्या दरबारात जाईल. पदयात्रा काढेल. जनतेसोबतचे संबंध पुन्हा सुधारेल. हाच एकमेव मार्ग आहे. याहून दुसरा कोणताही शॉर्टकट नाही.

देश पेटणार आहे

राहुल गांधी म्हणाले -देश पेटणार आहे. मी तुम्हाला कोरोनापूर्वी इशारा दिला होता. आता पुन्हा देत आहे. हे देशाच्या संस्था मोडित काढत आहेत. ते असे करतील तेवढी आग भडकेल. देशात हा भडका उडणार नाही याची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. ही आपले नेते व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. हे काम केवळ काँग्रेस करु शकते. या देशातील कोणत्याही जात, धर्म किंवा व्यक्तीने काँग्रेससाठी आपले दरवाजे बंद केले नाहीत. काँग्रेस सर्वांचा पक्ष आहे.

मोदी सकारमध्ये तरुणांना रोजगार मिळणार नाही

राहुल म्हणाले -मोदी व भाजपने रोजगार निर्मिती करणारा कणा मोडला आहे. सरकारने नोटाबंदी व जीएसटी लागू करुन त्याचा फायदा केवळ दोन-तीन उद्योगपतींना मिळवून दिला. यामुळे तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त झाले. यापुढे तरुणांना रोजगार मिळणार नाही. महागाईमुळे नोकऱ्या मिळणार नाहीत. युक्रेन युद्धामुळेही बेरोजगारी वाढेल.

सोनिया म्हणाल्या -काँग्रेस सत्तेत परतेल

सोनिया गांधींनीही यावेळी पक्ष केंद्रीय सत्तेत जोरदार पुनरागमन करेल असा ठाम विश्वास व्यक्त केला. त्या म्हणाल्या -सर्वांनी मिळून एकदिलाने काम करा. ज्येष्ठ नेत्यांनी तरुण नेत्यांना पुढे करण्यावर लक्ष्य केंद्रीत करावे. 2 ऑक्टोबरपासून भारत जोडो अभियान सुरू केले जाईल.

अनेक सुधारणांवर सीडब्ल्यूसीचे शिक्कामोर्तब

काँग्रेस कार्यकारिणीच्या रविवारी झालेल्या बैठकीत पक्षातील अनेक सुधारणांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. सीडब्ल्यूसीने काँग्रेस संघटना व राजकारणाशी संबंधित समितीच्या शिफारशीच्या आधारावर यापुढे एका कुटुंबात एक तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. कुटुंबातील दुसऱ्या नेत्यांनाही उमेदवारी मिळेल. पण, यासाठी संबंधित नेता गत 5 वर्षांपासून पक्षात सक्रिय असला पाहिजे. संघटनेत काम केल्याशिवाय दुसऱ्या सदस्यांना तिकीट मिळणार नाही. 5 वर्ष पदावर राहिल्यानंतर त्यांना 3 वर्षांच्या कुलिंग पिरियडमध्ये रहावे लागेल. 3 वर्ष बाहेर राहिल्यानंतरच संघटनेत पद मिळेल. ही शिफारस सीडब्ल्यूसीने मंजूर केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुढील 48 तासांत महाराष्ट्रातील गारठ्यात आणखी वाढ होणार; हवामान विभागाचा यलो अलर्ट

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 48 तासांत महाराष्ट्रातील गारठ्यात...

बिबट्या अखेर पुणे विमानतळावर पकडला….

पुणे-पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात गेल्या आठ महिन्यांपासून वावर असलेला...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन:वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

लातूर-देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज...