नवी दिल्ली- काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी दिल्लीत ५०० आणि १००० च्या एकूण चार हजार रुपये किमतीच्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकेच्या रांगेत उभे राहिले. संसद मार्गावरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोरील रांगेत राहुल गांधी उभे राहिले आहेत. सामान्यांना अतिशय त्रास होतो आहे. करोडपती नोटा बदलण्यासाठी रांगेत का दिसत नाहीत ? असा सवाल करून त्यांनी भाजपा सरकार वर हल्लाबोल केला आणि लोकांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला .खरोखर मंत्री ,खासदार ,आमदार , नगरसेवक , बडे उद्योजक , बिल्डर यांच्याकडे हजार पाचशेच्या नोटा नाहीत काय ? फक्त गरीबंकडेच आहेत काय ? गरीब सामान्य मध्यमवर्गीयांचीच गर्दी नोटा बदलण्यासाठी दिसते आहे असे म्हणत राहुल गांधी यांनी जोरदार धक्का दिला आहे .
राहुल गांधी यांना पाहताच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेबाहेर नोटा बदलण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर राहुल गांधीदेखील सामान्य माणसांसोबत रांगेत उभे राहिले. यानंतर आसपासच्या लोकांनी राहुल गांधीसोबत सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी केली. पण यावेळी राहुल गांधी नेमके काय म्हणाले ते ऐका जरूर ….