गरिबांना दरवर्षी ७२ हजार देणार, 25 कोटी गरीबांना लाभ; राहुल गांधींचा वायदा

Date:

नवी दिल्ली: सत्तरच्या दशकात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ‘गरिबी हटाव’चा नारा दिला होता. इंदिरा गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ‘न्याय स्किम’च्या माध्यमातून गरिबी हटावचा नारा दिला आहे. महिन्याला १२ हजार रुपयांहून कमी उत्पन्न असणाऱ्या देशातील २० टक्के गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देण्यात येईल, अशी घोषणाच राहुल गांधी यांनी केली. या स्किमबाबत अर्थतज्ज्ञांशी विचार विनिमय केला असून या योजनेचा देशातील ५ कोटी कुटुंबातील २५ कोटी लोकांना लाभ मिळणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. गेल्या पाच वर्षात देशातील गोरगरिबांची फसवणूक झाली आहे. देशातील जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. मात्र आता देशात आमचं सरकार आल्यास ‘न्याय स्किम’च्याद्वारे आम्ही देशातील २० टक्के गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देऊ. ज्यांचं मासिक उत्पन्न १२ हजार रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कमकुवत घटकातील लोकांचं मासिक उत्पन्न १२ हजार रुपये करण्यात येईल. म्हणजे एखाद्या व्यक्तिला महिन्याला ८ हजार रुपये पगार मिळत असेल तर सरकारच्यावतीनं त्याला आणखी ४ हजार रुपये दिले जातील. अशा तऱ्हेने त्यांचं मासिक उत्पन्न १२ हजार रुपयांवर नेलं जाईल. त्याचा देशातील २५ कोटी जनतेला थेट फायदा होईल, असं त्यांनी सांगितलं.

आम्हाला गरिबांना गरिबीतून बाहेर काढायचं आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आम्ही १४ कोटी लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढलं होतं, असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना दररोज ३ रुपये देण्याचं वचन दिलं आहे. मात्र आम्ही तुम्हाला वर्षाला ७२ हजार रुपये देऊन न्याय देणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, यावेळी त्यांनी अन्य कोणत्याही राजकीय प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार:रोहित पवार आक्रमक; कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित-युगेंद्र पवार मैदानात:बारामती पोलिस ठाण्यात दाखल; समर्थकांची गर्दी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

दिल्ली पोलिसांवर हिमाचलमध्ये गुन्हा दाखल,हिमाचल पोलीस म्हणाले,इकडे मनमानी नाही चालणार,नाकेबंदी करून थांबवले

शिमला-हिमाचल प्रदेशमध्ये दिल्ली पोलिसांवर बुधवारी एफआयआर (FIR) दाखल करण्यात...

मुंबई महापालिकेचे बजेट 80,952 कोटींचे,पण तब्बल 36 हजार कोटींच्या ठेवी वापरणार….

मुंबईकरांसाठी या अर्थसंकल्पात एक महत्त्वाची बाब समोर आली आहे....