नवी दिल्ली -काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी सोशल मीडियावर याची माहिती शेअर केली.
त्यांनी सांगितले की, ते होम आयसोलेशनमध्ये आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून केरळ, पुद्दुचेरी, पश्चिम बंगाल, आसाम आणि तामिळनाडूमध्ये त्या प्रचारसभा घेत होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी वाढता कोरोना पाहता बंगालमध्ये होणाऱ्या आपल्या सर्व रॅल्या रद्द केल्या होत्या.राहुल म्हणाले होते की, ‘कोरोनाची स्थिती पाहता मी पश्चिम बंगालमध्ये आपल्या सर्व सार्वजनिक सभा स्थगित करत आहे. मी सर्व राजकीय नेत्यांनाही सल्ला देईल की, त्यांनी सध्याच्या परिस्थितीत मोठ्या सार्वजनिक सभांच्या आयोजनाच्या परिणामांवर दिर्घ चर्चा करावी.’