हिंजेवाडी येथील रॅडिसन ब्ल्युने जलसंवर्धन आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी उचलले पाऊल
पुणे: विशेषज्ञांचा अंदाज आहे की, 2025 पर्यंत जगाच्या निम्म्याहून अधिक लोकसंख्य पाण्यासंबंधित समस्यांचा सामना करणार आहे. समुदायाची सेवा करणे रेडिसन ब्ल्युच्या स्वभावातच आहे. म्हणूनच पुण्यातील हिंजेवाडी येथील त्यांच्या टीमने ब्लू प्लॅनेट इनिशिएटिव्ह अंतर्गत पृथ्वीवरील अमूल्य जलसंपत्ती व त्याचे संरक्षण करण्यासाठी उपक्रम राबविला. समुदायाची सेवा आणि जनजागृती करण्याचा दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आला.
रॅडिसन ब्ल्यु टीमने अत्यंत उत्साहाने स्थानिक समुदायांमध्ये औदार्याची भावना पसरवित पसरवीत सकारात्मक बदल घडविण्यासाठी काम केले. यावेळी त्यांनी जलशुद्धीकरण व स्टोरेज टँकच्या स्थापनेचे कामकाज सुरु असलेल्या जिल्हा परिषद शाळेत ‘अवेअरनेस ऑफ क्लीन ड्रिंकिंग वॉटर’ या सत्राचे आयोजन केले. या सत्रामध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याविषयी बाळगावयाची सावधानता व शौचालयातील स्वच्छतेतेविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली.
या जिल्हा परिषद शाळेत एकच पाण्याची टाकी होती जी विविध कामांसाठी वापरात होती. मूलभूत गरजेपासून शाळेला वंचित झालेले पाहून रॅडिसन ब्ल्यु टीमने स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी शाळेला मदत करायचे ठरविले. विकासाच्या खूप मोठ्या कल्पनांमधून लहान पण अत्यंत महत्त्वाचे मुद्दे दुर्लक्षित राहून जातात. असे दुर्लक्षित मुद्दे शोधून व त्यांच्यावर काम करून आमूलाग्र बदल घडविण्याची जाणीव रॅडिसन ब्ल्यु टीम ठेवते.
या शाळेचे मुख्याध्यापक हरिभाऊ वेताळ म्हणाले की, “शाळेच्या आवारात पिण्यायोग्य पाण्याची सोय करण्यासाठी आम्ही झगडत होतो. पुण्यातील हिंजेवाडीच्या रॅडिसन ब्ल्युने पुढाकार घेऊन आमच्या या संघर्षाला पूर्णविराम दिला. शाळेत फक्त पाण्याची टाकी असणे पुरेसे नाही तर स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध असणे अत्यंत महत्वाचे आहे”.
त्यांनी वॉटर हार्डनेस ४५० पीपीएम वरून ५ पीपीएम पर्यंत घटवून टोटल डिजॉल्वड सॉलिड्स म्हणजेच एकूण विसर्जित घनपदार्थ ३०० एमजी प्रति लिटर वरून २० एमजी प्रति लिटर पर्यंत खाली आणले.
एका व्यक्तीपासून ते समुदायाने केलेल्या एकाधिक आणि योग्य कृत्यांमुळे आमूलाग्र बदल घडविता येतात. आजूबाजूचा परिसर वेळोवेळी स्वच्छ करून रॅडिसन ब्ल्युने स्वछ भारत अभियानाला हातभार लावला आहे. वैद्यकीय व रक्तदान शिबीर आयोजित करणे, स्थानिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करून कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठीदेखील कार्य केले आहे.
याप्रसंगी रॅडिसन ब्ल्युचे पंकज सक्सेना म्हणाले की, “ज्या समुदायामध्ये आपण वावरतो त्यावर सकारात्मक प्रभाव टाकणे आमच्या मिशनचे अविभाज्य भाग आहे. ही फक्त एक नम्र सुरवात आहे. सकारात्मक दृष्टीने आयुष्यांना स्पर्श करणे हा खूप संतुष्ट करणारा अनुभव असतो”.