शव वाहिकेच्या सेवेत आमुलाग्र बदल, सुसूत्रता आणि तत्पर सेवेस प्राधान्य – श्रीनिवास कंदुल.

Date:

क्रिएटिव्ह फाउंडेशन व सुमीरन हेल्थ केयर च्या वतीने शववाहीका चालकांना सुरक्षा किट.

पुणे-शव वाहिकेच्या सेवेत आमुलाग्र बदल केले असून कोरोनाच्या संकटकाळात या सेवेत सुसूत्रता आणि तत्पर सेवेस प्राधान्य देण्याच्या दृष्टीने नियोजन केले असल्याचे मनपा उपायुक्त श्रीनिवास कंदुल यांनी सांगितले. आज 40 शववाहीका शहरातील आठ भागात ठेवण्यात आल्या असून प्रत्येक भागात 5 याप्रमाणे व्यवस्था केली असून प्रतीक्षा काळ खूप कमी झाला असल्याचे ही श्री कंदुल म्हणाले. क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि सुमीरन हेल्थ केयर च्या वतीने शव वाहीका चालकांना पिपीई किट, सॅनिटायझर, मास्क, हंडग्लोव्हज व इतर साहित्य भेट देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, भाजप च्या कोथरूड मंडल सरचिटणीस अनुराधा एडके, महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे, उपाध्यक्ष राज तांबोळी,संगीता शेवडे,माजी नगरसेवक विकास दांगट, भाजप वैद्यकीय आघाडी च्या प्रदेश सह संयोजक डॉ. तेजस्विनी अरविंद,अमोल चौधरी,संतोष गायकवाड,रुपेश अटक इ मान्यवर उपस्थित होते.
सध्या परिचयातील अनेक स्नेही कोरोना चे बळी ठरत आहेत अश्या वेळी रात्री अपरात्री शव वाहिकेसाठी फोन येतात त्यावेळी पुष्पक च्या सेवेचा चांगला अनुभव येतो असे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले. श्रीनिवास कंदुल आणि त्यांच्या टीम ने उत्तम नियोजन केले असून त्यातून मयताच्या कुटुंबियांना आधार मिळतो, ताटकळत बसायची वेळ येत नाही आणि कोरोना रुग्णाचा ऑनलाईन मृत्यू पास तयार झाल्यावर लगेचच रुग्णालयात किंवा घरी पुष्पक त्याठिकाणी पोहोचते हे सेवा कार्य उल्लेखनीय असल्याचे ही संदीप खर्डेकर म्हणाले. येणाऱ्या काळात या शव वाहिकेचा कमीतकमी उपयोग व्हावा आणि कोरोना च्या संकटातून मुक्ती मिळावी हीच परमेश्वर चरणी प्रार्थना असल्याचे ही संदीप खर्डेकर म्हणाले.
यावेळी व्हेईकल डेपो चे प्रभारी सुपरवायझर बाळासाहेब जगदाळे यांनी ही मनोगत व्यक्त केले. सध्याच्या महामारी च्या काळात कोरोना योद्धांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देणे गरजेचे असून त्याचं भावनेतून त्यांच्या साठी पिपीई किट देण्याचे ठरविले असे सुमीरन हेल्थ केयरच्या सौ. मंजिरी दीक्षित म्हणाल्या.
संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले तर मंजुश्री खर्डेकर यांनी आभार प्रदर्शन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यभरात हरवलेल्या ४८ हजार २७८ पैकी ३६ हजार ५८१ महिलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश

मुंबई- राज्यात गेल्या वर्षभरात तब्बल ४८ हजार २७८ अल्पवयीन...