पुणे-राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर फसवणूक आणि भ्रष्टाचाराचे आरोप सातत्याने होत आहेत. त्यांचा राजीनामा राज्य सरकारने त्वरित घ्यावा अन्यथा त्यांना मंत्रीमंडळामधून बडतर्फ करावे अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. अब की बार भ्रष्टाचारी सरकार अशा शब्दात त्यांनी केंद्र सरकारवर त्यांनी टीका केली.पुण्यात काँग्रेस भवन येथे पायाल तिवारी फौन्डेशन च्या कार्यक्रमास ते आले असताना पत्रकारांशी बोलत होते ते म्हणाले की, खडसे मंत्रीपदाचा दबाव आणून निर्दोष सिध्द करीत आहे. ही बाब दुर्देवी आहे. खरे तर त्यांनी स्वतः हून त्वरित राजीनामा द्यावा. सध्याच्या सरकारमधील मंत्र्यांवर आरोप केले की लगेच मुख्यमंत्री मंत्र्यांना क्लीन चीट देत आहेत. राजीनामा घेण्याची वेळ आल्यास अर्धा डझनहून आधिक मंत्र्यांना घरी जावे लागेल. या भ्रष्ट मंत्र्यावर हे सरकार कारवाई का करीत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
खडसे यांना बडतर्फ करावे -राधाकृष्ण विखे पाटील
Date:
भोसरी येथील एमआयडीसीच्या जमीन खरेदी प्रकरणावर महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर फसवणूक आणि भ्रष्टाचाराचे आरोप मागील पंधरा दिवसांपासून केला जात आहे. त्यानंतर खडसे यांच्या राजीनाम्याच्या मागणीला जोर धरला आहे.
यावेळी विखे पाटील असेही म्हणाले कि , भाजपचे सरकार आल्यापासून 5 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, हजारो जनावरे मेली दुष्काळ निवारणात हे सरकार अपयशी ठरले . केवळ व्हिडिओ कॉन्फरन्स घेवून या समस्या सुटणार नाही दूरचे पाहता पाहता … सध्या काय जळते आहे ते पाहण्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे .