पुणे : गेल्या आठ दिवसांपासून वार्डातील पाणीपुरवठा सुरळीत नाही. भाजप नगरसेवकांच्या वार्डात पाणी येते मात्र आमच्याच वार्डात का येत नाही, तात्काळ पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुरळीत करा, अन्यथा परिणाम गंभीर होतील, असा आक्रमक पवित्रा आज पु्ण्यातील पाणीप्रश्नावरून शिवसेनेच्या नगरसेवक विशाल धनवडे यांनी घेतला. पुणे महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक सुरु असताना धनवडे यांनी अधिकारी आणि भाजपा पदाधिकारी यांना फैलावर घेतले . उद्यापर्यंत सुरळीत नाही झाला तर संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार, असल्याचेही त्यांनी सांगितले.पाण्याच्या टाकीत पाणी आहे. वीज आहे, मात्र पाणी पुरवठा का सुरळीत होत नाही?, असा प्रश्न यावेळी नगसेवक विशाल धनवडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारला. ते म्हणाले, पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने कालच महापालिका आयुक्तांना देखील सांगितले होते मात्र, त्यावर कोणत्याही प्रकारची हालचाल झाली नाही. त्यांमुळे आज आम्ही स्थायी समितीच्या दालनात आंदोलन करत आहोत. जोपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. तोपर्यंत अधिकाऱ्याला खुर्चीवर बसू देणार नाही.आज जर पाणी प्रश्न सुत्लां नाही तर उद्या तुम्हाला काळे फासू असा सज्जड दम भरत त्यांनी हे आंदोलन स्थगित केले.
स्थायी समितीच्या बैठकीत राडा- भाजप नगरसेवकाच्या वार्डात पाणी आणि शिवसेना नगरसेवकाच्या वार्डात ठणठणाट: आज प्रश्न सोडवा नाही तर उद्या काळे फासणार – धनवडेंंचा सज्जड इशारा
Date:

