रेसिंग इंडियाचे राजीव सेतु यांची एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपमध्ये टॉप ५ फिनिशसह भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी

Date:

स्पोर्ट्सलँड सुगो (जपान) – इदेमित्सु होंडा रेसिंग इंडियाने एफआयएम रोड रेसिंग चॅम्पियनशीप २०२२ मध्ये (एआरसीसी) आजवरची सर्वात चांगली कामगिरी केली आहे. आजच्या रेसमध्ये रायडर्सनी भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली. पहिल्यांदात भारताच्या सोलो टीमने एशियाच्या सर्वात अवघड रोड रेस चॅम्पियनशीपमध्ये टॉप ५ स्थान मिळवले आहे.

राजीव यांनी एआरसीसीच्या AP250 विभागात पाचवे स्थान मिळवत आजवरची भारतीय रायडरचे नवे सर्वोत्तम फिनिश नोंदवले आहे.

शनिवारी झालेली AP250 रेस या सीझनमधली सर्वात अवघड रेस होतीकारण त्यादरम्यान पहिल्याच लॅपमध्ये पाच रायडर्सचा अपघात झाला. १२ लॅपच्या या पहिल्या रेसमध्ये ग्रिडवर १४ व्या स्थानापासून सुरुवात करत राजीव यांनी पहिल्या लॅपनंतर लगेचच सहावे स्थान गाठले. तिथून त्यांनी आपले स्थान कायम राखलेमात्र रेसट्रॅक ओलसर असल्यामुळे पाचव्या रेसमध्ये ते पडले. मात्ररेस पूर्ण करण्याच्या जिद्दीने राजीव स्वतःला सावरत रेसमध्ये परत सहभागी झाले आणि अखेर पाचव्या स्थानावर त्यांनी चेकर्ड लाइन पार केली.

भारतीय रायडर राजीव सेतु यांनी स्पोर्ट्सलँड सुगो इंटरनॅशनल सर्किटमध्ये आपल्या पहिल्याच रेसमध्ये कौशल्यपूर्ण कामगिरी करत AP250 विभागातील पहिल्या रेसमध्ये पाचवे स्थान आणि ११ पॉइंट्स मिळवत टीमला एक पाउल पुढे नेले.

आजच्या कामगिरीविषयी अभिमान व्यक्त करत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या ब्रँड आणि कम्युनिकेशन विभागाचे ऑपरेटिंग अधिकारी श्री. प्रभू नागराज म्हणाले, होंडा रेसिंग इंडियासाठी आजचा दिवस आनंदाचा ठरला. आम्ही आमच्या टॉप ५ फिनिशच्या ध्येयाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. ओलसरपणामुळे बऱ्याच रायडर्सचा अपघात झाल्यानंतर अटीतटीच्या ठरलेल्या या रेसमध्ये आमचे रायडर राजीव सेतु यांनी आपले कौशल्य सिद्ध केले आणि पाचवे स्थान मिळत भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली. या दैदिप्यमान कामगिरीनंतर टीमने ११ पॉइंट्स मिळवले. त्यांनी आपल्या कामगिरीने नवा विक्रम नोंदवलाशिवाय टीमचे मनोधैर्यही उंचावले. दरम्यान सेंथिल कुमार अपघातामुळे रेसमध्ये सहभागी होऊ शकले नाही. हे अतिशय निराशाजनक होतेमात्रते वेगाने शिकत आहेत आणि मला खात्री आहेकी ते अधिक चांगल्या पद्धतीने पुनरागमन करतील. उद्याच्या रेसमध्ये रायडर्स अधिक चांगली कामगिरी करतील असा मला विश्वास वाटतो.

दरम्यान सेथिंल कुमार यांच्यासाठी आजचा दिवस अवघड ठरलाकारण ओलसर ट्रॅकमुळे पहिल्याच लॅपमध्ये त्यांचा अपघात झाला.

होंडा रेसिंग रायडरचे राजीव सेतु म्हणाले –

‘आजची रेस सर्व रायडर्सची खऱ्या अर्थाने परीक्षा पाहाणारी ठरली, कारण हवामान आमच्यासाठी अनुकूल नव्हते. ओलसर ट्रॅकवर मी घाई केली नाही आणि रेसमध्ये स्थैर्य राखले याचा मला आनंद वाटतो. अपघात होऊनही मी आधीसारखीच कामगिरी केली, कारण माझे सर्व लक्ष टीमसाठी पॉइंट्स मिळवण्यासाठी केंद्रित झाले होते. आमच्या मार्गदर्शकांनी दिलेले प्रशिक्षण आणि आतापर्यंतच्या अनुभवाच्या जोरावर मी रेसमधले सर्व अडथळे पार केले व एआरआरसीमध्य टीमसाठी नवा विक्रम नोंदवला. या कामगिरीमुळे चांगली प्रेरणा मिळाली असून उद्याच्या रेसमध्येही अशीच कामगिरी करण्यासाठी मी उत्सुक आहे.’

होंडा रेसिंग इंडियाचे रायडर सेंथिल कुमार म्हणाले –

‘जपानच्या सर्किटमध्ये रायडिंग करणे हे प्रत्येक होंडा रायडरचे स्वप्न असते आणि याच ट्रॅकवर आमच्या टीमने इतिहास घडवला याचा मला आनंद वाटतो. मात्र, खराब हवामान माझ्यासाठी मोठा अडथळा ठरला आणि त्यामुळे केलेल्या कामगिरीवर मी समाधानी नाही. आजच्या चुकांमधून शिकत मी उद्यासाठी जास्त चांगली तयार करत आहे. मला खात्री आहे, की या फेरीच्या उद्या होत असलेल्या अंतिम रेसमध्ये मी टीमसाठी चांगले गुण मिळवेन.’

२०२२ एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपविषयी (एआरआरसी)

एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपची २५ वी आवृत्ती ही १९९६ पासून भरवली जात असलेली आशियातील सर्वात स्पर्धात्मक रोड रेसिंग चॅम्पियनशीप आहे. २०२२ सीझनच्या एकूण सहा फेऱ्यांऐवजी आता पाच फेऱ्या घेतल्या जाणार आहेत. अधिकृत टेस्ट आणि २२ मार्च २०२२ रोजी चँग इंटरनॅशनल सर्किट (थायलंड) येथील सीझन ओपनर व सेपांग इंटरनॅशनल सर्किटवर (मलेशिया) दुसऱ्या फेरीनंतर ही चॅम्पियनशीप या वीकेंडला स्पोर्ट्स लँड सुगो इंटरनॅशनल सर्किट (जपान) येथे पार पडेल. ऑक्टोबर २०२२ मध्ये चॅम्पियनशीप सेपांग इंटरनॅशनल सर्किट (मलेशिया) येथे उपांत्य फेरीसाठी परत येईल आणि नोव्हेंबर महिन्यात चँग इंटनरॅशनल सर्किट, थायलंड येथे सीझनची सांगता होईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जर्मनीतील शिक्षणा करीता मार्गदर्शन

पुणे, १३ मार्च २५ - सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल...

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

पुणे दि. १३: समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती...

बंदिशींद्वारे भारतीय स्त्री शक्तीचा सन्मान

भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने उर्जा' : सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा...