Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

दत्तगुरुंची आराधना – माझे अध्यात्म आणि बालसंस्कार

Date:

रोज होणारी सकाळ ही प्रत्येकासाठी खुप महत्त्वाची, आशादायी आणि प्रसन्न असावी लागते. रोज सकाळी उठल्यावर प्रथम आपल्या दोन्ही हातांचे दर्शन घ्यावे,  म्हणजे दोन्ही हात जोडून त्यांना विनम्र अभिवादन करावे. हे आपल्या आजी- आजोबांनी लहाणपणी शिकवलेले संस्कार. त्यावेळी त्याचे महत्त्व तितकेसे कळत नव्हते पण आज मोठं झाल्यावर मात्र त्याची जाणीव होते आहे. आज आपण जे काही आहोत ते या संस्कार आणि दत्तगुरुंच्या कृपेमुळेचं.

रोज सकाळची सुरवात होते ती दोन्ही हातांचे दर्शन घेत आणि त्याचवेळी …

कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती।

करमूले तु गोविंदः प्रभाते करदर्शनम्॥  … हा श्‍लोक म्हणतच.

या श्‍लोकाचा अर्थही खूप परिपूर्ण आहे. आपल्या बोटांच्या अग्रामध्ये लक्ष्मी देवीचा वास असतो म्हणजेच त्या बोटांचा उपयोग करुन आपण आपली रोजची कामे करतो, याच बोटांमधल्या ताकदीने आपण लेखणी हातात धरतो आणि बोटे एकमेकांना जुळवून आपण अन्नाचा घास घेतो. खरंच आपल्या ह्या हातांना खूप महत्त्व आहे आणि त्यांना वंदन हे रोज करायला हवे.

देवाजवळ मग प्रार्थना केली जाते हा आजचा दिवस माझ्यासाठी खूप सुंदर असणार आहे. मी योजलेली कामे आज पूर्ण होणार आहेत आणि या सगळ्या गोष्टी पार पाडण्यासाठी लागणारे बळ, शक्ती आणि चांगले विचार करण्याची बुद्धी मला दे. गुरुमाऊली तू सदा माझ्या पाठीशी रहा, मग मला कशाचीही भीती वाटणार नाही, अशी प्रार्थना मी देवाजवळ करते आणि माझा दिवस सुरु होतो.

माझ्या कम्प्युटर टेबल वर तीन फोटो आहेत – 1. ज्ञानेश्‍वर महाराज, 2. सिद्धीविनायक, 3. सूर्याची प्रतिमा

मी माझ्या मनाने या तिघांची सांगड घातली आहे, हे माझे विचार आहेत.

ज्ञानेश्‍वर महाराज म्हणजे सरस्वती देवीचे उपासक. मनोभावे त्यांनी सरस्वती देवीची उपासना केली त्यातील एक कणभर तरी मला समजू दे. गणपती म्हणजे विद्येचे आराध्य दैवत. मला जे समजले आहे ते माझ्या कृतीतून आणि विचारातून लोकांपर्यंत पोहचू दे आणि सूर्याची किरणे ज्या प्रमाणे सगळीकडे पसरतात त्याप्रमाणे त्याचप्रमाणे चांगल्या विचारांच्या लहरी सगळीकडे पसरु दे आणि आजूबाजूचे वातावरण मंगलमय होऊ दे.

आजच्या सारखं माझ्या लहाणपणी कॉम्प्युटर, टीव्‍ही  किंवा फेसबुक नव्हतं. शाळेतून आल्यावर थोडावेळ खेळून झालं की दिवेलागणीला हातपाय धुवून देवासमोर प्रार्थना आणि परवचा म्हणण्याचा नित्यनेम होता. त्यात शुभं करोती बरोबर रामरक्षाही म्हटली जाई. त्यानंतर पाढे.  दर गुरुवारी एकमुखी दत्ताच्या तसबिरीला हार व नैवेद्य. दत्तगुरुंच्या आराधनेचे संस्कार लहानपणापासूनच मनावर झालेत.  पण खरच या सर्व नित्यनेमाचा म्हणा किंवा नकळत झालेल्या संस्काराचे महत्‍त्‍व आणि त्यामागील शक्ती अद्भूत आहे याचा आता वेळोवेळी प्रत्यय येत आहे.

आजच्या या धकाधकीच्या जीवनात थोडावेळ तरी मनापासून देवाची आराधना करावी. चांगलं काम करण्‍याचीभावना मनात ठेवावी. शेवटी आपण जे काही काम मनात स्वार्थी भाव न ठेवता करतो त्याचे आपल्याला कधी तरी चांगले फळ मिळतेच आणि आपल्याला मिळालेले आशीर्वाद, शुभेच्छा हे आपल्यासाठी कवचकुंडल्याचे काम करतात. या विश्‍वात ज्या चांगल्या लहरी संचारत असतात तशा वाईट लहरीपण संचारत असतात त्यांच्यापासून ही कवच कुंडले आपले रक्षण करतात. म्हणून नेहमी जेवढं होईल तेवढं चांगल घडेल ही भावना ठेवावी.

शेवटी संपूर्ण ब्रह्मांड म्हणजेच दत्तगुरु. आणि दत्तगुरुंच्या आराधनेमुळेच यश प्राप्त होते. हे संस्कार मला बालपणी मिळाले आणि या बालसंस्कारात प्रचंड शक्ती आहे याची प्रचिती आता मोठं झाल्यावर होते आहे. आज जे काही यश, प्रसिद्धी मिळते आहे ती दत्तगुरुंच्या आशीर्वादाने. या दत्तगुरुंच्या चरणी माझा मनोभावे साष्टांग प्रणिपात.

॥ श्री गुरु दत्त गुरु॥

॥दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा॥

– पुर्णिमा नार्वेकर, दहिसर

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...

‘आचार संहिता, नैतिक संकेतांची युती सरकार कडून पायमल्ली- काँग्रेस’चा आरोप

‘निवडणूक आयोगा’ने सत्ताधाऱ्यांना कारवाई च्या नोटिसा पाठवून आपली स्वायत्तता...

सातारा जिल्ह्यातील एमडी ड्रग्ज कारखाना प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न: हर्षवर्धन सपकाळ

सातारा ड्रग्ज प्रकरणावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच महानगरपालिकेच्या निवडणूका घाईगडबडीत...