Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

चौथ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी संघाची पहिल्या डावात 335 धावांची आघाडी

Date:

  • देव नवले, ओम खटावकर यांची शतकी खेळी 

पुणे, दि.16 ऑक्टोबर  2021- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित चौथ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात देव नवले(155धावा) व ओम खटावकर(नाबाद 133धावा) यांनी केलेल्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी संघाने पीवायसी हिंदू जिमखाना संघापुढे 335 धावांचे आव्हान उभे केले. तर, दुसऱ्या सामन्यात आदित्य राजहंस(166 धावा)याने केलेल्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाने 339 धावा केल्या. 
पीवायसी हिंदू जिमखाना येथील मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत तीन दिवसीय लढतीत पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी करताना ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी संघाने आज दिवसखेर 93षटकात 3बाद 335धावा केल्या. यात ओम खटावकरने 294 चेंडूत 19चौकार व 1 षटकारासह नाबाद 133 धावांची खेळी केली. ओमला देव नवलेने आक्रमक फलंदाजी करत 192 चेंडूत 26चौकार व 3षटकाराच्या मदतीने 155 धावांची खेळी करून सुरेख साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी 421चेंडूत 261 धावांची भागीदारी करून संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. पीवायसी हिंदू जिमखानाकडून ब्दुस सलाम(50-1), वैभव टेहळे(72-1), गुरवीर सिंग सैनी(48-1)यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. दोन्ही संघांचा अजून दोन दिवसांचा खेळ शिल्लक आहे.
लोणी येथील मैदानावर सुरु असलेल्या सामन्यात  पहिल्यांदा खेळताना युनायटेड स्पोर्ट्स क्लबचा डाव  71.4षटकात 339 धावावर आटोपला. यामध्ये आदित्य राजहंसने धडाकेबाज फलंदाजी करत 204 चेंडूत 20चौकार व 2 षटकारासह 166 धावांची खेळी केली. आदित्यने तनिष्क सितापुरे(55धावा)च्या साथीत 118 चेंडूत 112 धावांची खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर तनिष्क बाद झाल्यावर आदित्यने श्रीराज चव्हाण(59धावा)च्या  साथीत 160चेंडूत 146 धावांची भागीदारी करून संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. डेक्कन जिमखानाकडून  पुंडलीक पुजारीने 52 धावात 6 गडी बाद केले.  दोन्ही संघांचा अजून दोन दिवसांचा खेळ शिल्लक आहे.  
स्पर्धेचे उदघाटन गोल्फफिल्ड क्लब रिसॉर्ट लिमिटेड दापोलीचे अनिल छाजेड, रिजुता भालेकर, तेजल भालेकर व पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, क्लबचे खजिनदार चंद्रशेखर नानिवडेकर,अभिषेक ताम्हाणे, बिपीन चोभे, शिरीष साठे, सिद्धार्थ भावे, इंद्रजीत कामतेकर, रोहन छाजेड, अनुज छाजेड,  कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते. निरंजन गोडबोले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 

सामन्याचा सविस्तर निकाल: उपांत्यपूर्व फेरी: पीवायसी मैदान: पहिला डाव: ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी: 93षटकात 3बाद 335धावा(देव नवले 155(192,26×4,3×6), ओम खटावकर नाबाद 133(294,19×4,1×6), आकाश पांडेकर 22(30), अब्दुस सलाम 15-50-1, वैभव टेहळे 17-72-1, गुरवीर सिंग सैनी 17-48-1) वि. पीवायसी हिंदू जिमखाना:  पहिल्या डावात ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी संघाची 335धावा; 
लोणी मैदान: पहिला डाव: युनायटेड स्पोर्ट्स क्लब: 71.4षटकात सर्वबाद 339 धावा(आदित्य राजहंस 166(204,20×4,2×6), तनिष्क सितापुरे 55(71,4×4,4×6), श्रीराज चव्हाण 59(54,9×4,1×6), पुंडलीक पुजारी 15.4-52-6, निखिल धारणे 12-31-2, रुद्राज घोसाळे 11-68-1, जय पाटील 12-61-1) वि. डेक्कन जिमखाना: .  

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बेळगावी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे   14 डिसेंबरला अनावरण

मुंबई- केंद्रीय दूरसंवाद तसेच ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य एम....

खडकवासल्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर विधानसभेत आ. तापकीरांची लक्षवेधी –

पुण्यासाठी स्वतंत्र ट्रॅफिक प्लॅनर पद व समन्वय समिती स्थापनेचे...

चंद्रकांतदादा पाटील यांची वाचनप्रेमी कोथरुडकरांसाठी आनंदाची बातमी

कोथरुड मतदारसंघातील वाचकांसाठी विशेष सवलत योजना पुणे-तिसऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाच्या...

निगडी ते चाकण व्हाया वाकड मेट्रो ‘डीपीआर’ मंजुरीसाठी आ. शंकर जगताप यांच्याकडून मागणी!

चापेकरवाडा पुनर्विकास प्रकल्प; जलनिस्सारण प्रकल्प, जकात अभय योजनेबाबत मांडल्या...