शक्ति स्थापना दिनानिमित्त सविता कुलकर्णी आणि रेश्मा राठोड यांना पुरस्कार जाहीर

Date:

पुणे-शारदा शक्ति या महाराष्ट्रातील महिला संघटनेतर्फे शक्ति स्थापना दिवस निमित्त रविवार दि. २४ मार्च रोजी
सामाजिक योगदान देणाऱ्या औरंगाबादच्या सविता कुलकर्णी यांना शक्ति प्रेरणा पुरस्कारआणि युवा
कर्तृत्वाबद्दल बदलापूरच्या रेश्मा राठोड या युवतीसआय शक्ति सपोर्ट; या पुरस्काराने गौरविले जाणार आहे.
राष्ट्रसेविका समितीच्या पुणे कार्यवाह मीनाताई कानडे कार्यक्रमाच्या प्रमुख असतील. हा कार्यक्रम कर्वे
रस्त्यावरील डेक्कन कॉर्नर येथे असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र येथे दिनांक २४ मार्च रोजी
सकाळी १० वाजता सुरु होणार आहे.


विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरणासाठी शक्ति ही संस्था देशात कार्यरत आहे.
दिनांक २२ मार्च या राष्ट्रीय शक्ति स्थापना दिनानिमित्त शारदा शक्ति या पुणे शाखेतर्फे २४ मार्च रोजी
पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सातत्याने सामाजिक काम करणारी महिला आणि परिस्थितीशी संघर्ष करीत यश मिळवणाऱ्या युवतीस
दरवर्षी पुरस्कार देऊन गौरविले जाते. मानपत्र आणि भेटवस्तू, असे शक्ति प्रेरणा पुरस्काराचे स्वरूप आहे.
तसेच प्रशस्तीपत्र, ५००० रुपये रोख आणि भेटवस्तू असे आय शक्ति सपोर्ट पुरस्काराचे स्वरूप आहे.
स्त्री शक्ति प्रेरणापुरस्काराच्या यंदाच्या मानकरी औरंगाबादच्या सविता कुलकर्णी या बालपणापासून
राष्ट्रसेविका समितीशी संबंधित असून त्यांनी बीड, आंबेजोगाई, रायगड जिल्हा आदि ठिकाणी सामाजिक
जबाबदाऱ्या पार पाडल्या. १९९२ पासून औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानच्या डॉ.
हेडगेवार रुग्णालयाअंतर्गत गुरुवर्य लहूजी साळवे आरोग्य केंद्रात सामाजिक कामास त्यांनी प्रारंभ केला.
याबरोबरच सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाची त्यांनी स्थापना केली. तसेच ४५ महिला बचत
गटांची स्थापना केली. याशिवाय अन्नपूर्णा अन्नपदार्थ प्रशिक्षण, रचना शिवणकला प्रशिक्षण, दर्पण ब्युटीशियन
प्रशिक्षण, आभूशिका आभूषण प्रशिक्षण केंद्रांद्वारे १५०० हून अधिक महिलांना प्रशिक्षण देऊन महिलांना
रोजगाराची संधी उपलब्ध केली. तेजस्विनी महिला प्रकल्पाच्या माध्यमातून २५ सेवा वस्त्यांमध्ये सामाजिक
नेतृत्वगुण विकास, रक्तक्षय निवारण, नवदांपत्य समुपदेशन, स्वावलंबन या विषयातही त्या काम करीत आहेत.
याशिवाय २५ सेवा केंद्रांमध्ये किशोरी प्रकल्प आणि ममता बालवाडीचे त्यांचे काम चालू आहे. त्यांना अनेक
पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.
यंदाच्या ;आय शक्ति सपोर्ट पुरस्काराची मानकरी बदलापूरची रेश्मा राठोड ही राष्ट्रीय खो-खो पटू आहे.
बदलापूरमध्ये एका लहान घरात राहणाऱ्या रेश्माने मोठा भाऊ व बहिण यांच्या प्रोत्साहनाने खो खो खेळत
आंतरशालेय खो-खो स्पर्धा, महापौर चषक खो-खो स्पर्धा याबरोबरच जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय
पातळीवरील खो खो स्पर्धांमध्ये सहभाग घेत आपल्या क्रीडा नैपुण्याची चमक दाखवली. भोपाळ येथे झालेल्या
राष्ट्रीय कुमार-कुमारी खो-खो स्पर्धेत तिच्या खेळामुळेच महाराष्ट्राला विजेते पद मिळाले. याचवर्षी प्रतिष्ठेच्या
जानकी पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आले. तसेच खेलो इंडिया खेलो= चा ऑल राऊंडर हा
पुरस्कारही तिला देण्यात आला. नुकतीच तिने १२ वी ची परीक्षा दिली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नगरसेवक दुधानेंनी दाखविली कर्वेनगर मुख्य उड्डाणपूल चौकातील दुरावस्था,म्हणाले समस्या मुक्त परिसर करा

पुणे- नगरसेवक स्वप्निल देवराम दुधाने यांनी आपल्या प्रभागातील कर्वेनगर...

थेऊर फाट्याजवळ रासायनिक वायूगळतीचा थरार

पुणे–सोलापूर महामार्गावरील घटना; ‘मोनो मिथाईल अमाईन’च्या उग्र वासाने परिसरात...

राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा अंबरनाथ, कबड्डी स्पर्धा नागपूर, कुस्ती स्पर्धा बीड तर खो-खो स्पर्धेचे बारामती येथे आयोजन

महाराष्ट्राची क्रीडा परंपरा अधिक बळकट करण्यासाठी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा-उपमुख्यमंत्री...

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात महिला सुरक्षिततेवर उच्चस्तरीय बैठक

सेफ्टी ऑडिट अहवालाचा आढावा; पॅनिक बटण व्हॉट्सअ‍ॅपशी जोडण्याचे व...