पुणे-येत्या शनिवार दि ६-१०-१८ रोजी नटसम्राट निळू फुले रंगमंच ,पिंपरी चिंचवड पुणे येथे सायंकाळी ५ ते ८ अशी ‘नृत्याविष्कार’ ही शास्त्रीय नृत्याची मैफल सादर होणार असून, प्रवेश सर्वांसाठी खुला आणि विनामुल्य आहे .
या मैफलीत जेष्ठ कथ्थक नृत्य कलाकार पंडित ब्रोजन मुखर्जी यांच्या शिष्या कथ्थक नृत्यांगना शिल्पी बॅनर्जी व त्यांच्या शिष्य वर्गासह तसेच नृत्यांगना अर्चना सेंद्रे , निवेदिता तांबे यांच्या शिष्य नृत्यांगना प्रिया बिराडी त्यांच्या शिष्य वर्गासह “नृत्याविष्कार” ही मैफल सादर करणार आहेत .यात चरीष्णू ,तराना ,गुरुवंदना ,परण ,बोल – बाट अशा रचनांचा समवेश असेल, या मैफलीत वैविध्यपूर्ण कथ्थक रचनांचे सादरीकरण ही पुणेकर रसिकांसाठी पर्वणीच आहे. कथ्थक स्वतंत्र पेशकश तसेच गटाने नृत्याविष्कार सादर होतील.
यावेळी अनेक मान्यवर आपली हजेरी लावणार असून निर्मला कुंटे (नगरसेविका पी सी एम सी ) ,शत्रुघ्न बापू काटे(नगरसेवक पी सी एम सी ) ,जयनाथ शेठ काटे (पवना सहकारी बँक – चेअरमन ) ,शर्मिला मुजुमदार (उपासनाच्या सह संस्थापक) ,अविनाश कमीठकर (एच पी आय एन सी ),कुंदाताई भिसे व संजय भिसे (उन्नती सामाजिक फौंडेशन) आदि मान्यवर आपली उपस्थिती भूषविणार आहेत

