पुणे-कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंग यांनी आज पुण्यात चातुर्मासानिमित्त आलेल्या प.पू.१०८ पुलकसागरजी
महाराज यांचे धर्मानुरागी रसिकलाल.एम.धारीवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स,पुणे येथे जाऊन आशीर्वाद घेतले.

याप्रसंगी प.पू.१०८ पुलकसागरजी महाराज यांनी जुन्या आठवणींना उजाळा देऊन म्हटले की, मध्यप्रदेशाचे
मुख्यमंत्री असताना दिग्विजयसिंग यांनी गुरु परमपूज्य आचार्य पुष्पदंत सागरजी महाराज यांच्या नावाने इंदौर
पासून ६० किमी असणाऱ्या पुष्पगिरी येथे ३०० एकर जागा राज्यसरकारतर्फे दिली होती. येथे जैन समाजाचे
मोठे तीर्थक्षेत्र विकसित झाले असून शाळा, कॉलेज, इ. सुविधाही तेथे उपलब्ध झाल्या आहेत. अन्य
समाजांप्रमाणेच जैन समाजासाठीही दिग्विजयसिंग यांनी खूप मदत केली याचा उल्लेख प.पू.१०८ पुलकसागरजी
महाराज यांनी केला. याप्रसंगी दिग्विजयसिंग यांनी मध्यप्रदेशात विशेषतः बुंदेलखंड भागात दिगंबर जैन समाज
मोठा असल्याचा उल्लेख केला व मुनिश्रींना श्रीफळ अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतले. प.पू.१०८.
पुलकसागरजी महाराज यांनी दिग्विजयसिंग यांना आशीर्वाद स्वरुपात’पुलकसागरम्’पुस्तके भेट दिली.
प्रारंभी सकल जैन वर्षायोग समितीचे कार्याध्यक्ष मिलिंद फडे व सचिव जितेंद्र शहा यांनी दिग्विजयसिंग यांचे
पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. समितीच्या अध्यक्षा श्रीमती शोभा धारीवाल यांनी दिग्विजयसिंग यांना 'णमोकर'
मंत्राची चांदीची प्रतिमा व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीचे
सरचिटणीस अॅड.अभय छाजेड समितीचे पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

