रात्रीस खेळ चाले… (सीरिअल VS  क्रिकेट) : लेखिका -पूर्णिमा नार्वेकर

Date:

“१०.३० वाजायला आलेत, आता ‘रात्रीस खेळ चाले’ सुरू होईल”, सासूबाई उठून रिमोट घेणार इतक्यात…”आजी ‘रात्रीस खेळ चाले’ कुठे पाहते आता, हा बघ इथे रात्रीचा खेळ रंगात आला आहे” ओमकार झटकन म्हणाला. वानखडेवर चालू असलेला ‘मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब’ हा आयपीएलचा क्रिकेटचा सामना जबरदस्त रंगात आला होता. प्रत्येक बॉलला छातीचे ठोके वाढत होते. १० षटकांत मुंबईला फक्त ६५ धावांपर्यंत मजल मारता आली होती. पोलार्डने मात्र फलंदाजीची एक बाजू भक्कम सांभाळत पंजाबच्या गोलंदाजांवर हल्ला चालवला होता आणि अशा वेळी मॅच मधेच बघायची थांबून सीरिअल लावणे काही शक्य नव्हते. सासूबाईंच्या हे लक्षात आल्यावर त्याही निमूटपणे मॅच बघत बसल्या. मॅच ऐन रंगात आली होती. पोलार्डने हाणलेल्या प्रत्येक चौकार-षटकाराला घरातही मोठ्याने आरोळ्या मारत मॅचवरचे निस्सीम प्रेम व्यक्त केले जात होते. पोलार्डच्या फटकेबाजीने मुंबई नक्क्की जिंकणार, असे वाटू लागले असतानाच मोक्याच्या क्षणी तो आऊट झाला. पुन्हा आता काय होणार, कोण सरशी साधणार याची मनात धाकधुक सुरू झाली. शेवटच्या षटकात ही उत्कंठा तर टिपेला पोहोचली…कोण जिंकतंय, मुंबई की पंजाब?? आता पंजाब जिंकतोय असं वाटत असतानाच शेवटच्या बॉलला मॅच फिरली आणि मुंबई जिंकली. रात्रीचा हा खेळही रोमहर्षक आणि उत्कंठावर्धक झाला. आयपीएल सुरू होण्याआधी मार्चमध्येच ओमकारने आजीला साळसूदपणे सांगितले होते,  “आजी आता तुझा सीरिअलचा प्राईम टाइम चुकणार. आता आयपीएल आणि नंतर वर्ल्ड कप म्हणजे आमचा प्राईम टाइम चालू होणार.

गार्डनमध्ये संध्याकाळी राऊंड मारताना सुद्धा याचा प्रत्यय आला. नेहमी मुलांचा गोंगाट चालू असतो त्या मैदानात सामसूम होती. गार्डनमध्ये महिला मंडळाचा ग्रुप ७. ३० वाजले तरी गप्पा मारत होता. साधारणपणे ५ ते ६.३०-७  या वेळेत असणारा हा ग्रुप आता  गेल्या  काही दिवसांपासून उशिरापर्यंत चक्क गार्डनमध्ये कसा? आश्चर्य वाटले म्हणून ग्रुपमधीलच ओळखिच्या मावशींकडे चौकशी केली. “आता रोजच मॅच चालू असते गं, टीव्हीवर सीरिअल वगैरे काही बघायला मिळत नाही; मग आम्ही रिपीट टेलिकास्ट बघून उशिरा संध्याकाळी इकडे येतो”… मावशींनी आयपीएलच्या नावाने बोटे मोडली.

संध्याकाळी ६.३०. ते रात्री ११ हा सीरिअलचा, विशेषतः गृहिणींचा प्राईम टाइम. रात्रीच्या जेवणाची तयारी लगोलग करून रिमोटचा कंट्रोल आपल्याकडे घेऊन सीरिअलचा आस्वाद घ्यायचा हे प्रातिनिधिक चित्र, परंतु त्याच वेळेला मॅच चालू झाली की मात्र त्रागा. घरातल्या घरात द्वंद्वयुद्ध – सीरिअल विरुद्ध मॅच! सीरिअल रेकॉर्ड करून मागाहून बघता येते हो पण मॅचचं तसं नाही ना…ती लाईव्ह बघण्यातच खरी मजा. त्यामुळे आता आयपीएल ते थेट वर्ल्ड कपपर्यंत तरी हा माहोल धुमसत राहणार बहुदा.

वानखडेला पंजाबवर रोमांचक क्षणी मात करून मुंबईने विजयाची हॅटट्रिक साजरी केली. मॅच संपली की  रात्री उशिरा सीरियल. काही झालं तरी ‘रात्रीस खेळ चाले’चे एपिसोड रात्रीच बघण्यात मजा. क्रिकेटमध्ये मिनिटागणिक जशी वाढत जाते अगदी तशीच उत्कंठा …आज सरिता कशी वागणार आणि वच्छीची सून- शोभा, सरिताला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी कोणत्या नवीन क्लुप्त्या शोधणार…दोन्हीही रात्रीचे हे खेळ रंगात आणणारे!

लेखिका -पूर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग, 

दहिसर फाटक जवळ, दहिसर (प.), मुंबई – 400068

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

युद्धास कारण अन शिया सुन्नी संघर्ष

इराणमध्ये अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणच्या मुसलमानांनी तेथील...

युद्धाच्या पार्श्वभूमीवर दुबई येथे अडकलेल्या पुण्यातील १२३ नागरिकांबाबत माहिती प्राप्त

पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलीस नियंत्रण कक्ष सज्ज-जिल्हाधिकारी...

कॅन्सर मुक्त पुणे अभियानाचा शुभारंभ संपन्न

पुणे- दिनांक २ मार्च २०२६ रोजी महापौर मंजुषा...