खिडकी (लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)

Date:

 

मेरे सामने वाली खिडकी में, एक चाँद सा टुकडा रहता है… मस्ती चॅनेलवर ‘पडोसन’ चित्रपटातील सुनील दत्त-सायरा बानोवर चित्रित केलेलं गाणं सुरू होतं. समोर मोठ्या खिडकीत सायरा बानो…दोन दरवाजे आणि त्याला दोन पार्टीशनमध्ये असलेले झुळझुळीत पडदे आणि ती खिडकी ! 1968 साली प्रदर्शित झालेल्या पडोसन मधील खिडकीवरील हे सुपर डुपर हिट गाणे. तर त्या आधी म्हणजेच 1951 मध्ये अशाच एका खिडकीवरील  गाण्याने  सर्वत्र धुमाकूळ घातला होता. ते गाणे होते ‘अलबेला’ चित्रपटातील …

-शाम ढले खिडकी तले, तुम सिटी बजाना छोड दो,

घडी घडी खिडकी में खडी, तुम तीर चलाना छोड दो…भगवान आणि गीता बालीवर चित्रित झालेलं हे  गाणं… खिडकीवरील ही दोन्ही रेकॉर्ड ब्रेक गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत

 

त्या काळी बहुतेक घराला अशाच म्हणजे दरवाजे असलेल्या काचेच्या चौकटीतल्या खिडक्या होत्या. मग तो बंगला असो वा चाळीतले घर. बंगला असेल तर त्याला झुळझुळीत पडदे आणि चाळीतील खिडकीला जुन्या साडीचे पडदे, पण स्टाईल मात्र एकच होती-दोन पार्टीशन असलेले पडदे. खिडकीच्या दोन्ही बाजूला हुक लावायचे आणि त्या हुकना स्प्रिंग लावून त्यामध्ये ते पडदे लावले जायचे. चाळीतल्या घराला किमान दोन तरी खिडक्या असायच्याच, एक स्वयंपाकघराला आणि आणि एक हॉलला.

स्वयंपाकघराच्या खिडकीशी गृहिणीचे खास असे नाते  जोडलेले असायचे. स्वयंपाक करता करता खिडकीतून आत येणारी हवा आल्हादायक असायची. खिडकीजवळ रेडिओ ठेवला जायचा…कारण का तर आवाज नीट ऐकू यावा आणि खरखर होऊ नये म्हणून. सकाळच्या बातम्यांपासून ते विविध भारतीवरील कार्यक्रम ऐकत कामं चालायची. रोजच्या वेळेला कावळा पोळीच्या तुकड्यासाठी खिडकीवर येऊन बसून काव काव करायचा. मग ती गृहिणी हमखास त्याला पोळीचा तुकडा द्यायची आणि म्हणायची सुद्धा…आज अजून काव काव ऐकू कशी आली नाही याचाच विचार करत होते. तिचा आणि कावळे दादा मधील हा रोजचा संवाद… खिडकीशी असलेले जिव्हाळयाचे नाते ‘लंच बॉक्स’ या चित्रपटात मार्मिकपणे दाखवले गेले आहे. इला व तिच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या आंटी या दोघींचा खिडकीतून चालणारा संवाद आणि टोपलीला दोरी बांधून त्यामधून वस्तूंची देवाणघेवाण.

घरातल्या लहान मुलांना कडेवर घेऊन आयाबाया खिडकीत येणाऱ्या चिऊ-काऊ दाखवत त्यांना गोष्टी सांगत. चिऊ-काऊचा घास भरविण्याचा रोजचा परिपाठ असे. रात्री त्याच खिडकीमधून चांदोबाचे दर्शन व्हायचे आणि वाऱ्याची थंडगार झुळूक यायची. खिडकी सदैव उघडीच. पावसाळ्यातच काय ती बंद व्हायची आणि तीही मोठा पाऊस आला तरच. नाहीतर खिडकीतून येणारा पावसाचा शिडकावा तितकाच रोमहर्षक असायचा. आणि खिडकीत उभं राहून पावसाची वाट तितक्याच आतुरतेने पाहिली जायची. काळे ढग जमू लागले की खिडकीची काही दुरुस्ती असेल तर तीही केली जायची.

खिडकीत उभं राहून निवांतपणे बाहेरचं जग अनुभवण्याचा विरंगुळा काही औरच होता. मनातल्या गुजगोष्टीही खिडकीपाशी व्हायच्या आणि डोळ्यांतल्या गंगा-जमुनाही वाहून जायच्या. मनात चाललेला विचारांचा गोधळ असो वा भावनांचा कल्लोळ…जणू काही या खिडकीलाच कळायचा.

खिडकी ये सोने ना दे रे, रात भर मुझे जगाए रे…सपनों को, करवटों को, यादों को, उल्झनों को, रात भर फिर जगाए रे… रघु दीक्षित यांच्या गाण्यात त्यांनी तो आर्त भाव मांडला आहे.

अशी ही खिडकी फ्लॅट संस्कृतीत मात्र कुठे तरी गायबच झाली. आता आल्या मोठमोठ्या विंडो. उघडझाप काचेच्या चौकटीतले दरवाजे जाऊन मोठाल्या स्लायडिंग विंडो आणि हुकवर लावलेले पडदे जाऊन मोठे चॅनेल किंवा रॉडमधील डिझाइनर पडदे आले. त्यापुढे बंदिस्त ग्रिलही! आता कावळे दादाची कावकाव नाही आणि चिऊ-काऊची गोष्टही नाही. खिडकी आणि चिऊ-काऊही गोष्टीरूपात पुस्तकात जाऊन बसले. खिडकीतून दिसणारे मोहक दृश्य नाही की चांदोबाचे दर्शनही नाही.

मनातल्या भावनांच्या बंद झालेल्या खिडकीला आता उघडण्यासाठी आर्जव करावा लागेल. ‘रुख’ चित्रपटातील या गाण्याने ती आर्जवता मांडली  आहे-

देखो एक तरफ हे सुबह हो चली,

पर अंदर अभी भी राते ना ढली,

अब धूल चटक के भूल जा ना बिसरी,

रूह मोड दे अब तो खोल दे जिंदगी,

खुल जा रे…खुल भी जा ना रे खिडकी…

 

पूर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग,

दहिसर फाटक जवळ,

दहिसर (प.),

मुंबई – 400068

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महावितरणच्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामगिरीचा ‘बिग इम्पॅक्ट’ पुरस्काराने गौरव

मुंबई: दि. २६ फेब्रुवारी २०२६ – सर्वाध‍िक अत्याधुन‍िक स्मार्ट मीटर बसवून देशात प्रथम...

अगोदर तपास करू नंतर निष्कर्ष निघेल तसा गुन्हा दाखल करू-सीआयडीचे अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर स्पष्टीकरण

तपासाला कालमर्यादा नाही पुणे-दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा...

‘माझा मराठाची बोलु कौतुकें’

वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिन...