आठवणीतला रविवार …

Date:

‘रामायण’ची कुणी तरी आज क्लिप पाठवली, जुन्या आठवणी ताज्या करायला… ती क्लिप बघता बघता दूरदर्शनचा तो  काळ  डोळ्यांसमोर उभा राहिला.

रविवारची आतुरतेने आम्ही वाट पाहायचो. तेव्हा फक्त आणि फक्त दूरदर्शनच होते, आता सारखं भरमसाठ च्यानलचं जाळं त्या वेळी नव्हतं.  आणि मुख्य म्हणजे 24 टीव्ही चालू नसायचा.  त्याच्या नेमक्या वेळा ठरलेल्या असायच्या.

रविवार म्हणजे साप्ताहिकी – आठवड्याच्या कार्यक्रमाची तपशीलवार माहिती.  भक्ती बर्वे ती उत्तमरित्या सादर करायच्या.  आम्ही वहीत नोंद करून ठेवायचो कधी चांगला कार्यक्रम आहे ते.

रामानंद सागर यांच्या रामायण ने तर प्रसिद्धीचा कळस गाठला. इतका की त्या सीरिअलच्या वेळी रस्ते ओस पडायचे. प्रचंड लोकप्रियता  रामायण ने मिळवली होती. ही मालिका बघणारे सर्वच भक्तिभावाने त्यात रंगून जात. असा अनुभव त्या सर्वानाच आला असेल. ‘स्टारट्रेक’ नावाची एक इंग्रजी मालिका ही त्यावेळी रविवारी असायची, ती थरारक मालिका बघायला तेवढीच मजा यायची.

रविवारी सकाळी कार्यक्रम सुरु होण्या अगोदर टीव्ही ची अँटिना  बरोबर आहे ना कुठे वाकडी तिकडी तर  झालेली नाहीना हे आधी  बघितले जायचे. अँटिना बरोबर नसेल किंवा त्यावर पक्षी येऊन बसला कि टीव्ही वर रेषा रेषा यायच्या त्यामुळे मग मूड जायचा.  कार्यक्रमात व्यत्ययची पाटी आली तरीही सगळा मूड जायचा. संध्याकाळी हिंदी सिनेमा सुरु असताना २-३ वेळा तरी व्यत्यय यायचाच.

 

रविवार संध्याकाळ म्हणजे हिंदी सिनेमा. ही पण एक पर्वणी असायची.  घरातील सर्वजण एकत्र बसून तो सिनेमा एन्जॉय करत असू.  सिनेमामध्येही इंटरवलला बातम्या असायच्या, त्या तितक्याच आवडीने एखादा कार्यक्रम असल्यासारख्या बघितल्या जायच्या. साधारण रात्री 10 वाजता टीव्ही बंद व्हायचा.

आताचा रविवार म्हणजे टिव्हीवरील सतराशे साठ चॅनल आणि तेवढेच अठरापगड कार्यक्रम.  आता तर महा रविवार म्हणजे काही सीरिअलचे  १ तासाचे विशेष भाग दाखवले जातात. काय बघावं तेच कळत  नाही.

पूर्वीच्या रविवारच्या कार्यक्रमाची ती मजा आता नाही आणि आपल्या लडिवाळ आवाजाने, हसऱ्या चेहऱ्याने साप्ताहिकी सांगणाऱ्या भक्ती बर्वे ही हयात नाहीत. आता आहेत मनात साठवून ठेवलेल्या त्या आठवणी, ज्या आज पुन्हा जाग्या झाल्यात. रामायण ची व्हाट्सअप वर पाठवलेली क्लीप बघताना… दूरदर्शनची अविस्मरणीय रविवार सकाळ…

पूर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग,

दहिसर फाटक जवळ, दहिसर (प.), मुंबई – 400068

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सोलर एनर्जी प्रकल्प वापरणाऱ्यांना मिळकत करात 10 टक्के सवलत द्या – दुधाने आणि मानकर यांचा प्रस्ताव

पुणे-सोलर एनर्जी प्रकल्प, म्हणजेच सूर्यप्रकाशाद्वारे वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प...

प्रदूषणाने कॅन्सर; महाराष्ट्र सरकारची कबुली, 57% रुग्णांचे फुफ्फुस ‘आजारी’, राज्य सरकारच्या अभ्यासात मोठा खुलासा

बांधकामांच्या ठिकाणचे धुळीचे लोट रोखण्यासाठी मोहीम ही देवेंद्र फडणविसांची...

येरवडा कारागृहात 5 मोबाईल,2 पॉवर बँक,चार्जिंग वायर सापडली..

पुणे- येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न...