आकाशाशी जडले नाते… (लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)

Date:

आज आकाश ढगाळ असल्यामुळे नीटसं काही दिसत नाही आणि दिसले तरी फार काय तर शुक्रच ओळखता येईल आता तरी…आकाश अनुभवायला आणि ते समजून घ्यायला हल्लीच कुठे सुरुवात झाली आहे…आकाशाकडे बघता बघता या विचारांनी हसूही आले आणि गेल्या दोन दिवसांचा संपूर्ण प्रवास डोळ्यांसमोर उभा राहिला…

यावेळी शालेय उपक्रमाबरोबर आकाशदर्शनाचा कार्यक्रमही करणार होतो. त्यासाठी प्रल्हाद सरांनी सगळ्या शिक्षकांना थोडा जास्तीचा वेळ काढूनच यायला सांगितले होते. ओमकारचे ट्रेनिंग सेशन संपत आले होते, सूर्यही मावळतीला झुकला होता. थोडा वेळ होता, त्यात प्रल्हाद सरांनी यावर्षी २६ डिसेंबरला दिसणाऱ्या सूर्यग्रहणाची माहिती शिक्षकांना सांगितली आणि ते शाळेतील मुलांना कसे दाखवता येईल, त्यासाठी काय उपक्रम करायला लागलीत याचे डिटेल्स दिले. आमच्या बरोबर ऋतू (किशोर सरांचा मुलगा)  सुद्धा हे सगळे कान देऊन ऐकत होता. अंधार होत आला, पण आकाश ढगाळ होते. शुक्र अंधुकसा दिसायला लागला होता. प्रल्हाद सरांसोबत ऋतूनेही शुक्र ओळखला. ऋतूचे या वयातील आत्मविश्वास आणि माहितीभांडार वाखाणण्याजोगे आहे! तो प्रल्हाद सर आणि किशोर सरांच्या तालमीत तयार होतोय हे पदोपदी जाणवले. उशीर होत असल्याकारणाने बाकीच्या शिक्षकांनी निरोप घेतला. थोडा वेळ थांबून आकाश जरासं निरभ्र झाल्यावर तारे आणि ग्रह दिसायला सुरुवात झाली. ‘युवा परिवर्तन’च्या बाहेर मोकळ्या जागी आम्ही आकाश निरीक्षणासाठी जमलो. सर एकेका ग्रहाची माहिती, त्याची स्थिती सांगत होते. आपले कॅलेंडर आणि भारतीय सौर दिनदर्शिका यांमधील ठळक फरकही सांगितला. भारतीय सौर दिनदर्शिकेचा चैत्र महिना दर वेळी २१ किंवा २२ मार्चला सुरू होतो, मार्गशीर्ष महिन्याला ‘अग्रहायण’ म्हणतात हेही कळले. नेहरू तारांगणातून बघितलेले आकाश, ग्रह – तारे  खूप वर्षांनी प्रत्यक्ष अनुभवत होतो. लहानपणी आजोबा आणि सहदेवकाका मात्र आकाशातील ग्रह-तारे अचूक टिपायचे आणि आम्हाला दाखवायचे याची प्रकर्षाने आठवण झाली. सर माहिती सांगत होते. कालनिर्णय दिनदर्शिका आणि त्यातील महत्त्वाच्या ठराविक तिथी एवढाच काय तो आपला सामान्य माणसाचा पंचांगाशी असणारा संबंध.  बरीच रंजक माहिती सरांकडून मिळत होती. उशीर खूप झाला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा पहाटे ५ वाजता आकाशदर्शनासाठी जाणार होतो. सर निरोप घेऊन निघाले आणि आम्ही आमच्या येणाऱ्या पाहुणे मंडळींच्या स्वागताच्या तयारीला लागलो. तन्वी, आनंद, सासूबाई, नीलिमा, ओंकारचे बाबा सगळ्यांना आमच्या या उपक्रमाबद्दल प्रत्यक्ष जाणून घेण्याची उत्सुकता होती. सकाळी काही अडचणींमुळे येता आले नाही म्हणून त्यांनी रात्री यायचे ठरवले होते. तोपर्यंत गौरी, प्रदीप, रोहित आणि सोबत आजोबा येणार असल्याची वर्दी आम्हाला मिळाली. सर्व पाहुणे मंडळी येईपर्यंत रात्रीचे ११ वाजले. आलेल्या आमच्या पाहुणे मंडळींपुढे पूर्ण दिवसाचा आढावा एका नव्या उत्साहाने पुन्हा एकदा घेऊन झाला. झोपही आता अनावर आली होती, दिवसभराच्या धावपळीने गात्रं थकली होती. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून पुन्हा ग्रह-ताऱ्यांचे जग अनुभवायचे होते.

सकाळी पाचचा अलार्म कर्कशला पण आम्ही जागे झालो मात्र 5.30 ला. सर आमची वाट पाहतच होते. पुन्हा एकवार आकाश अनुभवण्यासाठी आम्ही मोकळ्या मैदानात आलो. आकाश थोडे ढगाळ होते. काल दिसलेला शुक्र काही दिसत नव्हता आणि ध्रुवताराही. स्वाती, चित्रा, हस्त, नक्षत्रं, सप्तर्षी हे पाहता आले. लुकलुकणारे असंख्य तारे पाहाण्यातही खूप गम्मत वाटत होती. सर एकेका नक्षत्राची माहिती, त्याचा दिसणारा आकार याबद्दल तपशीलवार सांगत होते. चंद्राच्या शीतल छायेत हे सारं आम्ही निवांतपणे टिपत होतो. कुठेही जाण्याची घाईगडबड नव्हती. सतत घड्याळाला बांधलेलो आम्ही निवांत आकाश अनुभवत होतो… आकाशाशी जडणारे हे नाते आताही आकाशात बघताना जाणवत होते…

 

पूर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग,

दहिसर फाटक जवळ,

दहिसर (प.),

मुंबई – 400068

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...