उत्साहाचा ऑक्सिजन  (लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)

Date:

 

“आई थोडा वेळ तरी खिडकीत बस, बघ किती मस्त वाटतंय. एकदम फ्रेश हवा आहे.” खिडकीत हवा खात बसलेला ओंकार सांगत होता. नुकतेच त्याचे सोशल मीडियावर ट्रेनिंग देऊन झाले होते. वाडा येथील किशोर काठोले सरांच्या घरीच या ट्रेनिंगचे आयोजन केले होते. परतीच्या प्रवासाअगोदर हवा असलेला थोडा निवांतपणा खिडकीत बसून तो अनुभवत होता.

वाड्याला जाण्याची आमची ही दुसरी खेप. पहिल्या भेटीचे कारणही तसे खासच होते. गणपतीला पेढे-लाडू ऐवजी शैक्षणिक साहित्य म्हणून प्रसाद आणावा – या ओंकारच्या आवाहनाला घरी येणाऱ्या आप्तेष्ट मंडळींनी भरभरून प्रतिसाद दिला. आणि या साहित्याचं वाटप वाड्यातील ‘बालिवली’ आणि ‘मोज’ येथील शाळांना करण्याचे ठरले. ओंकारच्या केसी कॉलेजच्या राम मोहन सरांनीच वाड्याच्या प्रल्हाद काठोले सरांशी संपर्क करायला सांगितला. आणि आम्ही तेथे भेट देण्याचे ठरवले. सरानी आणि मुलांनी खूप प्रेमाने आमचे स्वागत केले. सगळी मुलेही मिळालेली भेट बघून खूप आनंदात होती. पहिल्या भेटीचा अनुभव खूप काही आत्मिक समाधान देऊन गेला आणि त्याच वेळेस ठरवलं होतं की पुन्हा यायचं.

आणि तो योग आला…उत्साहाला उधाण आलं तर कामाला गती! महिन्याभर आधी प्रल्हाद काठोले सरांशी बोलणं झालं आणि ‘या वेळेस येताना मुलांसाठी काय भेटवस्तू आणू’ म्हणून आम्ही विचारलं. दैंनदिन जीवनात उपयोगात येणाऱ्या वस्तू द्यायच्या असं ठरलं गेलं. मग आमची टीम म्हणजेच ओंकार, मी, हेलेना आणि संपदा सगळेच कामाला लागलो. व्हाट्सअपवरील मेसेजमध्ये  आम्हाला काय काय हवे ते सांगितल्यावर कोणी पैशाने तर कोणी वस्तूंच्या स्वरूपात मदत केली.

सर्व साहित्यानिशी बालिवलीच्या शाळेत पोहोचलो, तर मुलं आणि सर वाट बघतच होते. प्रत्येकीस एक स्वतंत्र पाऊच आणि त्यात टिकल्या फणी, कंगवा, हेअर बँड, रुमाल, हेअर पिन, हुक, सुई, दोरा… मुली तर एक एक वस्तू काढून निरखून बघत होत्या. मुलांचीही तीच अवस्था  होती- रुमाल, फणी, साबण… सरांची नजर आपल्याकडे नाही ना हे पाहून त्या फणीचा उपयोग करूनही झाला होता. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि ती निरागसता यांचे शब्दांत वर्णन करणंही कठीण…तो क्षण मनाच्या कप्प्यात तसाच बंदिस्त करून ठेवावासा वाटला. मुलांनी केलेला पुष्पगुच्छ देऊन आमचे स्वागत  केले एवढेच नाही तर ‘स्वागत गीत’ही सगळ्यांनी म्हटले आमच्यासाठी. ते ऐकताना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे त्यातील एका मुलीने आम्ही दिलेले रंगीत हेअरबँड लगेच आपल्या दोन वेण्यांना बांधलेही होते आणि ती आमच्याकडे बघून स्मित हास्य करत होती. मधूनच त्या हेअरबँडना हात लावत होती. तिला झालेल्या आनंदाची ती पोचपावतीच होती. मोज शाळेतील अनुभवही असाच बोलका. मुलांबरोबरच दोन्ही शाळांसाठी आरसा, छोटे नॅपकिन आणि वैद्यकीय साहित्य घेऊन गेलो होतो. खरंच आपण यांच्यासाठी काही तरी करू शकतोय ही भावना सुखावून गेली. चर्चा करताना प्रल्हाद सर म्हणालेही, “मुलांना खूप आनंद झाला आहे. या वस्तू त्याच्या स्वतःच्या आहेत. नाहीतरी इथे घरी सर्वसाधारण एकच टॉवेल असतो, जो सगळ्यांनी मिळून वापरायचा; फणी असली तरी सगळ्याची मिळून एकच. प्रत्येकाच्या अशा स्वतःच्या वस्तू नसतात मुळी. त्यांना असं साहित्य कोणी आजपर्यंत दिलेलं नाही. आज वह्या, पुस्तकही देणार आहोत. या सगळ्या रोज लागणाऱ्या वस्तू आहेत. त्याही प्रत्येकाला स्वतंत्र पाऊचमधून, याचं त्यांना जास्त अप्रूप वाटतंय आणि आनंदही की या सर्व वस्तू माझ्या स्वतःच्या आहेत. खरंच, शहरी भागातील मुलांना हे सर्व विनासायास आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे बहुतेकांना त्याची किंमत नाही वा त्याचं आकर्षणही नाही…

मोज शाळेतील मुलांनी काढलेली चित्रं वास्तवतेशी जवळीक साधणारी होती. त्या शाळेतील सरांना याबद्दल विचारल्यावर ते म्हणाले की, आम्ही त्यांना जवळच्या पक्षी अभयारण्यात घेऊन जातो आणि समोर जे जे काही दिसते त्याचे चित्र काढायला सांगतो. निसर्गाच्या सान्निध्यात खऱ्या अर्थाने त्यांच्यातील मनस्वी कलाकाराला प्रोत्साहन देण्याचे काम इथे केले जाते. एका मुलाने निसर्गचित्र काढताना माडाच्या झाडावर चढलेला मुलगाही काढला होता, त्याला विचारताच उत्तरला- मीच आहे तो, मी चढतो ना झाडावर. या मुलांबरोबर गप्पा मारण्यात मजेत वेळ गेला.

आणि या आनंदात भर पडली ती QUEST च्या निलेश निमकर सरांशी झालेली भेट. त्यांच्याशी झालेल्या भेटीत आणि गप्पांतून या संस्थेचे कार्य आणि त्यामागचे विचार, तळमळ दिसून आली. या संस्थेच्या उपक्रमावर तसेच आतापर्यंतच्या वाटचालीवर स्वतंत्र लेखमालाच लिहायला हवी…

संध्याकाळ होत आली होती. दिवस कसा अगदी मस्त मजेत गेला. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद, ती निरागसता, निलेश सरांची भेट, आता पार पडलेले ओंकारचे शिक्षकांसाठी सोशल मिडियावरील ट्रेनिंग या सर्वांत खूप काही शिकायला आणि अनुभवायला मिळाले. खिडकीत निवांत बसून आणि ताजी हवा घ्यायला अजून थोडा वेळ तरी नक्कीच आवडले असते. पण निघायला हवे होते. पुढच्या भेटीची तारीख ठरवूनच निघालो तेही आत्मिक समाधान आणि उत्साहाचा ऑक्सिजन भरभरून घेऊनच!

 

पूर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग,

दहिसर फाटक जवळ,

दहिसर (प.),

मुंबई – 400068

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...