श्रावण… (लेखिका-पूर्णिमा नार्वेकर)

Date:

सरींवर सर बरसून

उन्हाचा कवडसा घेऊन…

ऊन-पावसाचा हा

लपंडाव खेळत…

हिरवाईने नटूनथटून

असा हा श्रावण येतो…

श्रावण! श्रावण महिना हा लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडता. जून महिना चालू झाला की आपल्याला वेध लागतात ते पावसाचे. थेंबाथेंबाने ओघळणारा पाऊस, तर कधी उग्र रुप धारण करून मुसळधार कोसळणारा पाऊस, ज्‍येष्‍ठ-आषाढ सरता सरता श्रावणात हलक्याशा सरीने बरसत येतो. सर्वत्र छान मखमली हिरवळ पसरलेली असते. झाडेही पानांनी आणि विविध रंगांच्या फुलांनी नटून या श्रावण महिन्याचे स्वागत करायला सज्ज झालेली असतात. खूपच मनमोहक आणि उल्हासित वातावरण असते.

श्रावण सुरू झाला की चालू होतात व्रत-वैकल्ये, उपासतापास. देवघरातल्या देवांबरोबर जीवतीचीही पूजा केली जाते. श्रावणी सोमवार आला की भाविक शिवामुठ आणि दूध घेऊन भगवान शंकराच्या देवळापुढे रांगा लावतात, तर शनिवारी तेल-माळ घेऊन मारुतीरायांसमोर नतमस्तक होतात. श्रावण महिन्यात जीवतीला एखाद्या शुक्रवारी पुरणपोळीचा नैवेद्य करून सवाष्ण स्त्रीला जेवू घालतात. नातेवाईक, ओळखीपाळखीचे, कुणाच्या ना कुणाच्या घरचे सत्यनारायणाच्या पुजेचे बोलावणे असतेच. आणि मंगळागौर आहेच की…पूर्वीसारखे पारंपरिक खेळ खेळले जात नसले तरी 12 वाजेपर्यंत जागरण करून मजा-मस्ती करत मंगळागौर साजरी होते.

श्रावण महिन्यात सणावारांची एकापाठोपाठ एक रांगच लागलेली असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला, बैल पोळा, पिठोरी अमावस्या. प्रत्येक सणाचं स्वतःचं वेगळं असं महत्त्व आणि वैशिष्ट्य.

प्रत्येक सण साजरा करण्याची पद्धत ही जातीधर्मानुसार वेगवेगळी…सांगायचंच झालं तर नागपंचमीला पाटावर नागोबा काढून कुणी खीर-पुरीचा, कुणी वरणभात, भेंडा व वाटाणा भाजी, उकडीचे मोदक तर कुणाकडे दुध व लाह्या यांचा नैवेद्य दाखवतात. नारळी पौर्णिमेला खास करून नारळीभात किंवा नारळीवड्या असा बेत असतो. गोकुळाष्‍टमीला गोडपोहे, केळ्याच्या पोळ्या असे नैवेद्यात वैविध्य असते. शिळा सप्तमीला मातीचे लाडू करून विहिरीची पूजा करतात. पिठोरी अमावस्या म्हणजेच मातृदिन, त्या दिवशी मुलाबाळांच्या सौख्यासाठी पूजा केली जाते.

काही गुजराथी समाजातही हे सण साजरे करण्याची पद्धत वेगळी आहे. नागोबाला सुखा दाल-चावलचा नैवेद्य दाखवून, तुरीच्या डाळीची खिचडी व लाल दांड्याच्या चवळीची भाजी खाऊन एक वेळ उपवास केला जातो. भाऊबीजेसारखेच रक्षाबंधन अधिक उत्साहाने साजरा करतात. सकाळपासून भरजरी साड्या नेसून शीला बेन, नीता बेन आपापल्या भाऊरायांकडेच म्हणचे माहेरी जायला आतूर झालेल्या असतात. तर सातम-आठम साजरी करण्याची पद्धत आणि मजा काही वेगळीच. कुटुंबातील सगळ्या बायका एकत्र जमून षष्ठीलाच मस्त स्वयंपाक करून ठेवतात. पुरी भाजी, कंटोलाची भाजी, वडे, दुधपाक असा मेजवानीचा झकास बेत असतो. षष्ठीला रात्री अग्नीदेवाची पूजा करून दुसऱ्या दिवशी दिवसभर चूल पेटवत नाही. रात्रभर गप्पागोष्टी करण्यात तर काही जण पत्ते खेळण्यात घालवतात. दुसऱ्या दिवशी सातमला म्हणजेच सप्तमीला सितळादेवीची पूजा करून आदल्या दिवशी बनविलेल्या चविष्ट भोजनाचा आस्वाद घेतात. अष्टमीला एक वेळ उपवास करतात, तर नवमीला नऊ प्रकारचे कडधान्य वाफवून (फोडणी न देता) केलेली भाजी व बाजरीची भाकरी खातात. खरोखरच वेगवेगळ्या जातीधर्मात श्रावणातील सण हे वेगळ्या पद्धतीने साजरे केले जात असले तरी त्या मागची भावना मात्र एकच असते…भक्तीची, प्रेमाची आणि आपुलकीची.

असे हे निरनिराळे सण घरोघरी साजरे होत असताना तरूणांसाठीही खास महाविद्यालयातून साजरे होणारे ‘उमंग’ आणि ‘मल्हार’ सांस्कृतिक महोत्सवही असतात. या महोत्सवांमधून विविध कलागुणांना वाव मिळतो. त्याचप्रमाणे कला, संगीत, नृत्य, साहित्य, अशा अनेकविध कलारंगांची उधळत होत असते. किंबहुना आकाशातले इंद्रधनुष्यही त्याचीच साक्ष देते.

असा हा श्रावण येतो तो आनंदाच्या, उत्साहाच्या, प्रेमाच्या, भक्तीच्या सरींवर सरी घेऊनच!

पूर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग,

दहिसर फाटक जवळ,

दहिसर (प.),

मुंबई – 400068

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबई महापालिकेचे बजेट 80,952 कोटींचे,पण तब्बल 36 हजार कोटींच्या ठेवी वापरणार….

मुंबईकरांसाठी या अर्थसंकल्पात एक महत्त्वाची बाब समोर आली आहे....

बदलत्या काळानुसार पत्रकारांनी तंत्रस्नेही होणे गरजेचे – प्रा. सुशोभन पाटणकर

ए आय तंत्रज्ञानाद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी शहानिशा आवश्यक पिंपरी,...

मुंबई प्रमाणे पुण्यातही 500 चौ. फूट घराला मिळकत कर शून्य करा- स्थायी च्या पहिल्या बैठकीत कॉँग्रेस चा प्रस्ताव

ऐतिहासिक निर्णयाबाबतचा चेंडू आता अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंच्या मैदानात.. प्रशासनाचा...

सोलर एनर्जी प्रकल्प वापरणाऱ्यांना मिळकत करात 10 टक्के सवलत द्या – दुधाने आणि मानकर यांचा प्रस्ताव

पुणे-सोलर एनर्जी प्रकल्प, म्हणजेच सूर्यप्रकाशाद्वारे वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प...