पंजाबी गायक दलेर मेहंदीला अटक:2003च्या मानवी तस्करी प्रकरणी 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा

Date:

पटियाला – प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी याला पोलिसांनी अटक केली आहे. 2003 मध्ये दलेर मेहंदीवर मानवी तस्करीद्वारे बहुसंख्य व्यक्तींना अमेरिकेत पाठवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दलेर आणि त्याचा भाऊ शमशेर या दोघांनी 10 लोकांना परदेशात ठेवल्याचा आरोप आहे. यामध्ये दलेर मेहंदीला 2 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याने या शिक्षेला पटियालाच्या सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. तेथेही शिक्षा कायम राहिल्याने गुरुवारी त्याला अटक करण्यात आली. दलेरला आता शिक्षा भोगण्यासाठी पटियाला सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात येणार आहे. माजी क्रिकेटपटू नवज्योत सिद्धूही याच तुरुंगात आहेत.

ट्रायल कोर्टाने सुनावली होती शिक्षा
2003 मध्ये दलेर मेहंदीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2018 मध्ये, पटियालाच्या न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सुमारे 15 वर्षांच्या सुनावणीनंतर त्याला दोन वर्षांचा कारावास आणि 2,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. 3 वर्षांपेक्षा कमी शिक्षा झाल्यामुळे दलेर मेहंदीला त्याचवेळी जामीन मिळाला. या प्रकरणात आरोपी बुलबुल मेहताची निर्दोष मुक्तता करण्यात आली. दरम्यान दलेर मेहंदीचा भाऊ शमशेर सिंग आणि ध्यानसिंग यांचा मृत्यू झाला आहे.

सत्र न्यायालयाने याचिका फेटाळली
दलेर याने ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला पटियाला सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान अतिरिक्त सत्र न्यायाधीश एचएस ग्रेवाल यांनी दलेरची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर दलेरला तेथून अटक करण्यात आली.

दलेरवर मानवी तस्करी केल्याचा आरोप
दलेर मेहंदी आपल्या म्युझिक टीमसोबत लोकांना परदेशात पाठवत आणि त्याबदल्यात मोठी रक्कम मिळवत होता, असा आरोप आहे. परदेशात गाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर भारतातून नेलेल्या व्यक्तींना तो तिकडेच सोडून येत असे, असे म्हटले जाते. याप्रकरणी पहिला गुन्हा 2003 मध्ये अमेरिकेत दाखल करण्यात आला होता. मानव तस्करीद्वारे बहुसंख्य व्यक्ती अमेरिकेतच पाठवण्यात आले. दलेर आणि शमशेर या बंधूंनी 1998-99 मध्ये 10 लोकांना परदेशात ठेवल्याचा आरोप आहे. दलेर मेहंदीविरोधात एकूण 31 प्रकरणी आरोप होते. अवैधरित्या लोकांना परदेशात पाठवल्याचा आरोप दलेर मेहंदीवर होता. मानव तस्कर प्रकरण हे 2003 मधील असून, तब्बल 15 वर्षांनी दलेर मेहंदी दोषी ठरला. त्याला गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...