पुणे-परवा झालेल्या तुफानी पावसाने पुण्याच्या प्रत्येकाची पाचावर धारण बसवल्यानंतर राजकीय पक्षांच्या काही जणांकडून एकमेकांवर अस्त्रे डागण्याचे प्रकार सुरु झालेले असताना पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रत्यक्षात पुणेकरांची माफी मागितली आहे. पाउस जोरदार होता , ढग फुटीसारखा होता,आम्ही राज्यात सरकार मध्ये असल्याने आमची जबाबदारी निश्चित आहे, पण पी हळद आणि हो गोरी असे होत नाही त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजितदादा यांना मी आव्हान करतो , एकमेकांवर शेरेबाजी करण्यापेक्षा एकत्र बसून मार्ग काढू , नाले कसे रुंद करता येतील ,आणखी काय उपाय योजना करता येतील , महापालिका आणि राज्य सरकार या दोहोंकडून निधी मिळवून या समस्येवर मात करणारे काम कसे करता येईल हे प्रथम पाहू ,त्याच बरोबर यापूर्वी नाले सफाई झाली काय ? त्यात काही दोष होते काय याबाबत देखील चौकशी करू असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
पुण्याची तुंबापुरी:मंत्री चंद्रकांत पाटलांची दिलगिरी,चौकशी अन उपाय योजनेसाठी विरोधकांना बरोबर घेणार
Date:

