पुणे- पुण्याच्या महापौरपदाच्या निवडणुकीत प्रशांत जगताप यांचा विजय झाला. पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका होणार असल्याने महापौरपदाच्या या निवडीला विशेष महत्त्व आहे. यावेळी मनसे ने मतदानावर बहिष्कार टाकून एक प्रकारे राष्ट्रवादीला सहाय्य केले तर काँग्रेसचा राष्ट्रवादीला पाठिंबा असल्याने या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जगताप मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. उपमहापौर पदाची निवडणूक काँग्रेसचे मुकारी अलगुडे यांनी जिंकली.
प्रशांत जगताप यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अशोक येनपुरे यांच्यावर 59 मतांनी विजय मिळविला. जगताप यांना 84 मते मिळविली, तर अशोक येनपुरे यांना 25 मतांवर समाधान मानावे लागले. तसेच, शिवसेनेचे उमेदवार सचिन भगत यांना केवळ 11 मते मिळाली. दरम्यान, मनसेने घेतली तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.
पुण्याच्या महापौरपदी प्रशांत जगताप ; उपमहापौरपदी मुकारी अलगुडे
Date:




