पुणे शहर जिल्हा माळी समाज परिचय डायरी नोंदणीस ह. भ .प. मनोहर महाराज तिडके यांच्या हस्ते नावनोंदणीस सुरुवात करण्यात आली . सोमवार पेठमधील सिद्धिविनायक केशरमध्ये हा कार्यक्रम झाला . यावेळी पुणे जिल्हा माळी समाज परिचय डायरीचे संचालक बाळासाहेब लडकत , महेश जांभुळकर , सुधीर लडकत , धनंजय लडकत , निखिल कोद्रे , नीरज कुदळे , जगन्नाथ लडकत , अनिल व्हावळ , भरत लडकत आदी मान्यवर उपस्थित होते .
पुणे शहर जिल्हा माळी समाज परिचय डायरीमध्ये माळी समाजातील समाजबांधवांची संपूर्ण माहितीचा समावेश असणार आहे . समाजबांधवाचे नाव , दूरध्वनी , मोबाईल , व्यवसाय , नोकरी ,राहण्याचा पत्ता, रक्तगट , ई – मेल अशी सर्व माहितीचा समावेश असणार आहे . तसेच , माळी समाजातील खासदार , आमदार , नगरसेवक , डॉक्टर , वकील , पत्रकार , सरकारी अधिकारी , उदयोजक आदींचा समावेश असणार आहे . तरी माळी समाजबांधवानी आपली सर्व माहिती पुणे शहर जिल्हा माळी समाज परिचय डायरी नोंदणी कार्यालय ,यशोदा भवन , सिद्धिविनायक केशर , नरपतगीर चौकाजवळ , ४३१ , सोमवार पेठ , पुणे – ४११०११, बाळासाहेब लडकत – मोबाईल – ९८२३०५७५०९ येथे संपर्क साधावा .


