पीएमपीएमएलच्या “एक्झिबिशन ऑन व्हिल्स” उपक्रमास पुणेकरांचा उस्फूर्त प्रतिसाद

Date:

पुणे-पीएमपीएमएल च्या १५ व्या ‘वर्धापन दिनानिमित्त’ या आठवडय़ात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
पीएमपीएमएल चा आजपर्यंतचा इतिहास, पीएमपीएमएल च्या विविध बससेवा व विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत
पोहोचविण्यासाठी “एक्झिबिशन ऑन व्हिल्स” (फिरते प्रदर्शन) या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
“एक्झिबिशन ऑन व्हिल्स” या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण
मिश्रा व पीएमपीएमएलच्या सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरूरे यांच्या हस्ते शुक्रवार, दि. २२ एप्रिल
२०२२ रोजी पीएमपीएमएल च्या मुख्य प्रशासकीय इमारत स्वारगेट येथे बसेसना हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.
पीएमपीएमएल व्दारे पुरविल्या जाणाऱ्या विविध बससेवांची तसेच विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती
लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी “एक्झिबिशन ऑन व्हिल्स” या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या
माध्यमातून दोन बसेस मध्ये ‘फिरते प्रदर्शन’ तयार करण्यात आले आहे. “बस फॉर अस” फाऊंडेशनचे प्रतिनिधी व
पीएमपीएमएल च्या स्वारगेट मध्यवर्ती यंत्रशाळेतील कर्मचारी यांनी त्यांचे कौशल्य व अनुभवाच्या जोरावर फिरते
प्रदर्शनाकरीता दोन बसेस मध्ये अप्रतिम अशी मांडणी केली आहे. पीएमपीएमएलच्या पुणे दर्शन, पुण्यदशम, अभि एअरपोर्ट
बससेवा, रातराणी, विशेष (प्रासंगिक करार) बस सेवा,  पुष्पक, तेजस्विनी, स्मार्ट एसी ई बस, रेनबो बी.आर.टी., अटल शटल
आदी लोकल्याणकारी बस योजनांची माहिती या ‘फिरत्या प्रदर्शनाच्या’ माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध
करून देण्यात आली आहे. तसेच सिल्व्हर ज्युबिली मोटर्स, पी.एम.टी. व पी.सी.एम.टी. ते पीएमपीएमएलचा आजपर्यंतचा
वेगवेगळ्या टप्प्यातील इतिहास ‘फिरते प्रदर्शना’ च्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रदर्शन बस तयार करण्यासाठी पीएमपीएमएलचे चिफ मेकॅनिकल इंजिनिअर सुनील बुरसे, झोनल मॅनेजर
कैलास गावडे यांचे मार्गदर्शनाखाली पीएमपीएमएल च्या स्वारगेट मध्यवर्ती यंत्रशाळेतील कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
तसेच “बस फॉर अस” फाऊंडेशनचे रोहित धेंडे, आदित्य राणे व त्यांच्या टीमने “एक्झिबिशन ऑन व्हिल्स” हा
नाविन्यपूर्ण उपक्रम प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सहकार्य केले. या “एक्झिबिशन ऑन व्हिल्स” (फिरते प्रदर्शन) चा लाभ पुणे व
पिंपरी चिंचवड शहरवासियांनी घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यातील विद्यार्थिनीच्या आत्महत्याप्रकरणाची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीरपणे दखल

कुटुंबाशी फोनवर संवाद साधत दिला धीर पुणे.दि.१३: पुण्यातील बोटॅनिकल सर्व्हे...

इराण भारतीय जहाजांना होर्मुझ पार करण्यास मदत करणार:अमेरिकेला म्हटले- होर्मुझवर हल्ला केला तर आखातातील कोणतेही बंदर सुरक्षित राहणार नाही

इराणवर अमेरिकेच्या नौदलाची नाकेबंदी सुरू-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात साडेतीन हजाराहून अधिक लाभार्थ्यांना मिळाला लाभ

पुणे, दि.१३: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत लोणीकंद...