फिरत्या हौदातील विसर्जनाला पुणेकरांची पसंती

Date:

पुणे (प्रतिनिधी)

कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षीही पुणेकरांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत घरच्या घरी आणि फिरत्या हौदात बाप्पाच्या विसर्जनाला पसंती दिल्याची आकडेवारी पुढे आली आहे. विशेष म्हणजे नदीपात्रात विसर्जनासाठी न येता पुणेकरांनी संकल्पानुसारच विसर्जन केले आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी टळली असून सलग दुसऱ्या वर्षी विसर्जन नियोजन यशस्वी झाले आहे.

गणेशाला निरोप देताना नदीपात्रातील विसर्जन घाटावर आणि कृत्रिम हौदात दरवर्षी मोठी गर्दी होत असते. मात्र गेल्यावर्षीसह यंदाच्या वर्षीही घरच्या घरी विसर्जन, मूर्ती संकलन केंद्र आणि फिरते हौद असे तीन पर्याय पुणेकरांना उपलब्ध करुन देण्यात आले होते. या तिन्ही पर्यायांना पुणेकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण केलेल्या संकल्पाला प्रतिसाद दिल्याबद्दल पुणेकरांचे आभार मानावेत तितके कमी आहेत. घरच्या घरी विसर्जन करता यावे, यासाठी २७७ केंद्रांवर ९६ हजार २०३ किलो अमोनियम बायकार्बोनेट वितरीत करण्यात आले होते. शिवाय फिरत्या हौदांची सोय करताना घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून ६०, नगरसेवकांनी उपलब्ध करुन दिलेले ८४ आणि क्षेत्रिय कार्यालय पातळीवरील ७३ असे एकूण २१७ फिरते हौद उपलब्ध करण्यात आले होते. यामुळे नागरिकांना विसर्जनाची उत्तम सोय उपलब्ध झाली.

‘कोरोनाच्या संकटकाळी आपण सर्वांनी केलेल्या संकल्पानुसार यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला. यंदाचा उत्सव धार्मिक आणि पारंपारिक पध्दतीने, मंगलमय वातावरणात आणि सामाजिक भान जपत सर्वांनी साजरा केला. यासाठी सर्व पुणेकर आणि गणेशोत्सव मंडळांनी मनस्वी साथ दिली. सर्वच पुणेकर तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, पोलीस आणि महापालिका प्रशासनाचे आभार मानण्याऐवजी मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो, असेही महापौर मोहोळ म्हणाले.

◆ संकलित मूर्तींची संख्या
१ लाख ०६ हजार ३१६

◆ फिरत्या हौदातील संख्या
१ लाख ४४ हजार ८०५

◆ एकूण
२ लाख ५१ हजार १२१

◆ जमा झालेले निर्माल्य
२ लाख ९२ हजार ६७७ किलो

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सत्तेच्या लोभी राजकारणाला आम आदमी पार्टी शह देईल..अरविंद केजरीवाल,भगवंत मान पुण्यात प्रचाराला येणार

पुणे- ' महाराष्ट्रात प्रस्थापित राजकीय पक्षांनी विचारधारा सोडून सामान्य...

प्रशांत जगतापांच्या राजीनाम्याचे वृत्त बदमाशीचे ..खोडसाळ

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप...

प्राजक्ता पटवर्धन यांना भाऊसाहेब स्मृती पाटणकर स्मृती पुरस्कार

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे रविवारी गौरव पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे मराठीतील आद्य...

अडचणींना सामोरे जात फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घ्या : गजाला शेख

गजाला शेख लिखित ‘द फिनिक्स पाथ’ पुस्तकाचे प्रकाशन पुणे :...