Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

डीपी तील आरक्षणे सरसकट वगळल्याच्या निषेधार्थ आंदोलन तीव्र करणार !

Date:

पुणे :
पुण्याच्या विकास आराखड्यासंदर्भात शासकीय त्रि -सदस्यीय समितीने सरसकट आरक्षणे वगळल्याच्या निषेधार्थ आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार आज खासदार वंदना चव्हाण यांनी निमंत्रित केलेल्या पुणेकर नागरिक ,स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी ,सामाजिक -राजकीय कार्यकर्त्यांच्या ‘डीपी मार्गदर्शन ,माहिती अभियान चर्चासत्रात ‘ करण्यात आला
चर्चेसाठी वेळ न देणाऱ्या मुख्यमंत्र्यांबद्दल नाराजी चा सूर या चर्चासत्रात उमटला
खासदार एड . वंदना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हे चर्चासत्र टिळक रस्त्यावरील इंडियन मेडिकल असोसिएशन च्या सभागृहात झाले .
अनिता गोखले -बेनिंजर (नगर नियोजन तज्ञ ) ,सुजित पटवर्धन(परिसर ) ,सतीश खोत(नेशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीज ) ,सारंग यादवाडकर तसेच ,जुगल राठी ,विवेक वेलणकर (सजग नागरिक मंच ),दीपक बिडकर (सेव्ह पुणे इनीशिएटिव्ह ), ललित राठी (जनाधार ) इत्यादी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी नी आपली मते या चर्चासत्रात मांडली .
खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या ,’पुण्याच्या विकास आराखड्यातील ९०० पैकी ३८१ आरक्षणे त्रि -सदस्यीय समितीने काढली आहेत आणि निवासी केली आहेत . पुणे पालिकेच्या लोकनियुक्त प्रतिनिधींच्या विकास आराखडा मंजूर करण्यासाठी २ दिवस सुद्धा मंजूर न करता हक्क काढून घेणाऱ्या सरकारने त्रि -सदस्यीय समितीला मात्र ३ महिने वाढवून दिले . सरकारने हा आराखडा पालिकेकडून नाही तर पुणेकरांकडून काढून घेतला आहे . त्रि -सदस्यीय समितीने अपेक्षाभंग करीत पुण्यावर अन्याय करणारे कारनामे केले . त्याविरुद्ध आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊन आंदोलनाद्वारे जनजागृती करीत आहोत .बिल्डर धार्जिणे धोरण सोडून  सरकारने आरक्षणे पुन्हा प्रस्थापित करावीत . पुणेकर नागरिक आणि कार्यकर्त्यांनी घराघरात -सोसायट्यात जाऊन जागृती करावी ,सरकारवर पोस्ट कार्डांचा पाउस पाडावा ‘
      अंकुश काकडे म्हणाले ,’ विकास आराखड्याच्या बाबतीत बौद्धिक दिवाळखोरी दाखवली जात असून त्यातून महापालिका निवडणुकीसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद केली जात आहे . ‘
अनिता बेनिंजर म्हणाल्या ,’ त्रि -सदस्यांनी केलेला आराखडा केराच्या टोपलीत टाकण्यासारखा आहे. नगर नियोजनाचे साधे नियम देखील शासकीय समितीने पाळले नाहीत आणि हा आराखडा अमलात आणण्याच्या खर्चाबद्दल काहीच सांगितले जात नाही . पुणेकरांच्या ३ लाख सूचनांचा आदर राखला जाणार नसेल तर इतका खटाटोप का केला  ? हा पुणेकरांचा अपमान आहे .  .
सुजित पटवर्धन म्हणाले  ,’विकास आराखडा अमलात आणणे हे आयुक्ताचे काम असते ,मात्र आतापर्यंत प्रत्येक आयुक्ताने स्वताच्या डोक्यातील नवी योजना आणून नवेच दिवे लावले . आता सर्व विकास आराखडा नव्याने केला पाहिजे ‘
सतीश खोत म्हणाले ,’विकास आराखड्याच्या विरोधात न्यायालयात देखील गेले पाहिजे ‘
सारंग याद्वाडकर म्हणाले ,’स्मार्ट प्लानर नसलेले लोक स्मार्ट सिटीचे नियोजन करीत आहेत . विकास आराखडा ही गॉन केस असून त्याला नव्याने पुनरुज्जीवित केले पाहिजे . ‘
विवेक वेलणकर यांनी स्मार्ट सिटी योजनेचे वाभाडे काढले . विकास आराखड्यात नियोजन भयंकर असून सर्व पक्षांनी एकत्र येवून हा आराखडा रद्द करावा ‘ असे ते म्हणाले
दीपक बिडकर म्हणाले ,’पुणेकरांचा दबाव वाढविण्यासाठी नागरिकांनी रात्री एसेमेस करून मुख्यमंत्र्यांविरुद्ध ‘झोपमोड आंदोलन ‘ करावे . बीडीपी मिळविण्यात सर्वांनी यश मिळवले आता चांगला डीपी मिळविण्यात यश मिळवले पाहिजे ‘
एड . म वि अकोलकर म्हणाले ,’त्रि -सदस्यीय समितीने पुणे शहरावर सामुदायिक अत्याचार केला आहे . त्यांचा राजीनामा मागितला पाहिजे ‘
राजलक्ष्मी भोसले म्हणाल्या जनजागृतीसाठी  whats अप ,पत्रके वाटणे ,होर्डिंग लावली पाहिजे
यावेळी आराखड्यातील तरतुदींचे सादरीकरण अभिजित बारावकर आणि मनाली भिलारे यांनी संगणकाद्वारे उपस्थितांना दाखवले . हे सादरीकरण पुणे डीपी ‘ पेज वर उपलब्ध करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली
अशोक राठी यांनी प्रास्ताविक केले . रुपाली चाकणकर यांनी आभार मानले
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...