पुण्याला राज्यातील सर्वोत्तम शहर बनवणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

Date:

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन, उदघाटन

पुणे, दि. १३: पुण्याला राज्यातील सर्वोत्तम शहर बनवण्याचा संकल्प असून त्यासाठी सर्वांना बरोबर घेत शहरातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यात येत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.खराडी येथे ऑक्सिजन पार्कचे भूमिपूजन श्री. पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास पर्यटन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार सुनील टिंगरे उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, कोरोना संकटाच्या काळात नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा देण्याचा आणि  लसीकरणाचा प्रयत्न केला. दोन वर्षात आपल्याला ऑक्सिजनचे महत्व लक्षात आले. शासनाच्या प्रयत्नांमुळे राज्य ऑक्सिजन निर्मितीच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले आहे. रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत. ऑक्सिजन पार्क नागरिकांच्या आरोग्यासाठी महत्वाचे ठरेल. या प्रकल्पाला निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

ऑक्सिजन पार्क उपयुक्त ठरणार
श्री. पवार पुढे म्हणाले, या प्रकल्पावर साडेबारा कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. सर्व वयोगटासाठी उपयुक्त ठरावा अशी याची रचना असणार आहेत. त्यात ओपन थिएटर, जिम, मुलांसाठी अभ्यासिका, सायकल ट्रक, बालकांसाठी खेळाची जागा आदी अनेक सुविधा परदेशातील सुविधांच्या धर्तीवर करण्यात येणार आहे. कडुनिंब, अशोका आदी झाडांसह अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने घोषित केलेली सर्वाधिक ऑक्सिजन देणारी झाडे या पार्कमध्ये लावण्यात येणार आहेत. या पार्कसोबत विविध प्रकारची झाडे लावून टेकड्या हिरव्यागार करण्याचा प्रयत्न आहे. शासनाच्या माध्यमातून पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. अर्थसंकल्पात पंचसूत्रीच्या माध्यमातून राज्याच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे.

पायाभूत सुविधांच्या विकासाला गती
पुढील ३ वर्षात राज्यात सर्व सुविधांच्या निर्मितीसाठी ४ लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.  पुण्यात सर्व प्रकारच्या वैद्यकीय उपचार सुविधा असलेली देशातील पहिली मोठी ‘मेडिसिटी’ वसाहत उभारण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे मेट्रोसाठी दीड हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच रिंग रोडच्या भूमी संपादनासाठी ३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीं आहे. पुणे- नाशिक सेमी- हायस्पीड रेल्वे प्रकल्पावर १६ हजार कोटी रूपये खर्च होणार आहे . मेट्रोची कामे करताना नागरिकांना वाहतूककोंडीचा त्रास होणार नाही अशा पद्धतीचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्याचे ते म्हणाले.

रोजगारनिर्मितीवर शासनाचा भर
कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या, रोजगार गेले. व्यवसाय पडला. त्यामुळे मनुष्यबळाला मदत करण्याची, युवकांसाठी इन्क्युबेशन सेंटर, इनोव्हेशन सेंटर सुरू करण्याची गरज आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीसाठी उद्योगांना आकर्षित करण्याचे धोरण शासनाने अवलंबले आहे.

विकासासाठी सर्वांना सोबत घेणार
पुणे, पिंपरी चिंचवड सह जिल्ह्यात आणि राज्यात शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून सर्व जाती धर्माला बरोबर विकास साधायचा आहे अशी शासनाची भूमिका आहे.

नागरिकांनी कार्यक्रमांना स्वागतावर खर्च करण्याऐवजी वृक्षारोपण किंवा शाळेला मदत करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले.

ऑक्सिजन पार्कसारखे नाविन्यपूर्ण प्रकल्प महत्वाचे-कु.तटकरे
कु.तटकरे म्हणाल्या, परिसराच्या विकासासाठी पायाभूत सुविधांसोबत ऑक्सिजन पार्कसारखे नाविन्यपूर्ण प्रकल्प महत्वाचे आहेत. या प्रकल्पासाठी प्रादेशिक पर्यटन प्रकल्पातून अडीच कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आणखी ५ कोटींचा निधी पुढील टप्प्यात प्रस्तावित करण्यात आला आहे. एकूण प्रकल्प १२ कोटी ५० लक्ष रुपयांचा आहे. पर्यटन विभागाच्या माध्यमातून अशी चांगली कामे करण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरते असे त्यांनी सांगितले.

विविध विकासकामांचे भूमिपूजन
आज उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन झाले.पुणे  पंचशील चौक, ताडीवाला रोड येथे नूतनीकृत शिल्पाचे उद्घाटन, फुलेनगर- नागपूर चाळ येथे स्वर्गीय माजी महापौर भारतजी सावंत पाम उद्यानाचे उद्घाटन, धानोरी जकात नाका येथे राजयोग मेडिटेशन सेंटर, अग्निशामक केंद्र, माजी सैनिक सांस्कृतिक भवन तसेच उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी माजी आमदार रामभाऊ मोझे, कमलताई ढोले पाटील, नगरसेवक प्रशांत जगताप, प्रदीप गायकवाड, नगरसेविका शीतल सावंत, रेखाताई टिंगरे, उषाताई कळमकर आदी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...

नगरपरिषद, नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता संपूर्ण यंत्रणा सज्ज- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

मतदारांना मतदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन पुणे, दि. १९: राज्य निवडणूक...

पेशवे पार्कमधील कोट्यवधींच्या शिवसृष्टीची दुरावस्था:भाजप व प्रशासन जबाबदार- शिवसेनेची निदर्शने

पुणे—पेशवे पार्कमधील कोट्यवधींची शिवसृष्टी धुळखात पडून ठेवण्यात आली आणि...