बड्या हस्तींच्या बड्या मोटारी लक्ष -पुण्यात’धूम’टोळी सक्रीय- पोलीस नेहमीप्रमाणे निष्क्रिय

Date:

पुणे : नगरसेवकांसह राजकीय क्षेत्राशी संबंधित लोकांच्या महागड्या फॉर्च्युनर कार चोरून नेण्यावर सध्या चोरट्यांच्या टोळीने जोरदार सपाटा लावल्याची सद्यःस्थिती आहे. मंगळवारी रात्री चोरट्यांनी शहराच्या वेगवेगळ्या भागातून अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने तब्बल तीन फॉर्च्युनर कार (फॉर्च्युनर) चोरून नेल्या. काही दिवसांपासून शहरात कार चोरीचे प्रकार वाढले असूनही आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश येत असल्याची सद्यःस्थिती आहे.

नगरसेवक पोटे यांची मोटार सिंहगड रस्त्यावरून त्यांच्या घराजवळून २४ जानेवारीला मध्यरात्री २ ते ३ च्या दरम्यान चोरीस गेली होती. या वेळी ही गाडी शोधण्याचा प्रयत्नही पोटे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात करण्यात आला. मात्र, त्यांच्यासह पोलिसांना त्यात यश आले नाही आणि पुणे शहरातून ‘फॉर्च्युनर’ चोरण्याचा सपाटा सुरू झाला. त्यानंतर नऊ एप्रिलच्या पहाटे मिलिंद वस्ते यांची ‘फॉर्च्युनर’ चोरीला गेली. एका कारमध्ये आलेल्या तीन चोरट्यांनी अवघ्या काही वेळात त्यांची कार चोरली. या वेळी कारचा वाजलेला सायरन त्यांनी अवघ्या काही सेकंदात बंद केला आणि सराईतपणे कार चोरली. त्यानंतर चोरट्यांचे धाडस अधिकच वाढले.

चोरट्यांनी २९ एप्रिलच्या मध्यरात्री पुन्हा ‘फॉर्च्युनर’ चोरी केल्या. कसबा पेठेत रस्त्यावर पार्क करण्यात आलेली राजवर्धन शितोळे यांची ‘फॉर्च्युनर’ अवघ्या १५ मिनिटांत चोरट्यांनी चोरली. चोरीच्या ‘फॉर्च्युनर’मध्ये बसून चोरटे जुना तोफखाना येथे आले. तेथे, नगरसेवक धंगेकर यांची ‘फॉर्च्युनर’ पार्क केलेली होती. चोरट्यांनी ते आलेल्या मोटारीमध्ये बसून तंत्रज्ञानाच्या साह्याने धंगेकर यांच्या ‘फॉर्च्युनर’चे लॉक उघडले आणि काही मिनिटात त्यांनी धंगेकर यांची ‘फॉर्च्युनर’ चोरली आणि ते पसार झाले. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा कोथरूडकडे वळविला.

कोथरूड येथील अनिल विटेकर यांची ‘फॉर्च्युनर’ केळवाडी चौकात पार्क करण्यात आली होती. चोरट्यांनी पहाटे चारच्या सुमारास ती मोटार अगदी सहज चोरली. चोरट्यांनी सराईतपणे अवघ्या पाच ते सहा मिनिटांत तीही मोटार चोरली. तेथे उपस्थित असलेल्या बँकेच्या सुरक्षारक्षकाला विटेकर यांचा चालक ती मोटार नेत असावा, असे वाटले. चोरट्यांकडून सुरू असलेला ‘फॉर्च्युनर’ चोरीचा सपाटा पाहून इतर ‘फॉर्च्युनर’ मालकांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे. ‘फॉर्च्युनर’ रस्त्यावर पार्क केली, तर ती सहज चोरीला जात असल्याने या मोटारींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.कोथरूडमधील केळेवाडी येथील अनिल विठ्ठल विटेकर यांच्या मालकीची फॉर्च्युनर कार चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. विटेकर यांनी त्यांच्या घरासमोर बुधवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कार लावली होती. त्यानंतर चोरट्यांनी त्यांची चोरून नेली. विटेकर यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

कसबा पेठेतील कारचोरीप्रकरणी राजवर्धन योगेंद्र शितोळे (वय 36, रा.शनिवार पेठ) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शितोळे हे सोमवारी रात्री कसब्यातील त्यांच्या जुन्या घरी गेले होते. त्यांनी त्यांची फॉर्च्युनर कार (एमएच 12, एमबी 7070) कसबा पेठेतील रॉयल ट्रॅव्हल्ससमोरील मोकळ्या जागेत लावली होती. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांची कार चोरून नेली. दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे नऊ वाजता शितोळे यांना आपली कार चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान शिवाजीनगर येथील जुना तोफखाना परिसरात दिलीप राणे यांनी त्यांच्या ताब्यातील फॉर्च्युनर कार (एमएच 12 एलडी 5472) रस्त्याच्याकडेला मंगळवारी रात्री दहा वाजता लावली होती. दरम्यान, कसबा पेठेतून कार चोरणाऱ्या चोरट्यांनीच पहाटे तीन वाजता राणे यांची कार अवघ्या 18 मिनीटांमध्येच चोरून नेली. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास राणे बाहेर जाण्यासाठी निघाले, तेव्हा कार चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान ही कार नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्या मालकीची असल्याची माहिती पुढे आली.

नगरसेवक दीपक पोटे यांची फॉर्च्युनर कार त्यांच्या घरासमोरून चोरीस गेली होती. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. दरम्यान बिबवेवाडी परिसरातील एका माजी नगरसेवकाचीही फॉर्च्युनर कार चोरीस गेली. याबरोबरच सहकारनगर येथूनही एक वॅगनर कार मागील आठवड्यात चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. असे असूनही पोलिसांकडून कार चोरीच्या प्रकरणाचा संथगतीने तपास सुरू आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार:रोहित पवार आक्रमक; कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित-युगेंद्र पवार मैदानात:बारामती पोलिस ठाण्यात दाखल; समर्थकांची गर्दी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

दिल्ली पोलिसांवर हिमाचलमध्ये गुन्हा दाखल,हिमाचल पोलीस म्हणाले,इकडे मनमानी नाही चालणार,नाकेबंदी करून थांबवले

शिमला-हिमाचल प्रदेशमध्ये दिल्ली पोलिसांवर बुधवारी एफआयआर (FIR) दाखल करण्यात...

मुंबई महापालिकेचे बजेट 80,952 कोटींचे,पण तब्बल 36 हजार कोटींच्या ठेवी वापरणार….

मुंबईकरांसाठी या अर्थसंकल्पात एक महत्त्वाची बाब समोर आली आहे....